सोमवारी राष्ट्रपती भवनाच्या गच्चीवर ट्रॅकिंग ‘डिव्हाइस’ बसवलेला गरुड आढळून आल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर सुरक्षा रक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जोरदार वादळ आणि पावसामुळे गरुड जखमी होऊन तिथेच पडला होता. राष्ट्रपती भवनात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्याची तपासणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जोराच्या पावसाच्या मारामुळे जखमी झाला गरुड
दिल्लीतील काही भागात सोमवारी जोरदार पाऊस झाला होता. या पावसात हा गरूड जखमी झाला आणि तो राष्ट्रपती भवनाच्या गच्चीवर पडला होता. त्याला उचलण्यासाठी जेव्हा भवनातले अधिकारी गेले तेव्हा त्यांना त्या गरुडाला जोडलेले सेटलाईट यंत्र आढळून आले. अधिकाऱ्यांनी सुरक्षा यंत्रणेला याबाबत माहिती दिली. गरुडावर बसवण्यात आलेले यंत्राची तपासणी करण्यात आली.

तपासणीनंतर सत्य समोर
डिव्हाईससोबत एक चिठ्ठीदेखील सापडली आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सत्य समोर आले. चौकशीनंतर यात काहीच संशयास्पद आढळून आलेले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या एका मुंबईतील अधिकाऱ्यांनी पक्षाच्या हालचालीचा मागोवा घेण्यासाठी आणि अन्य माहिती मिळवण्यासाठी हे यंत्र गरुडाला लावले असल्याचे समोर आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agle with tracking device found rashtrapati bhavan sparks concerns officials find conservation project dpj
First published on: 31-05-2022 at 19:23 IST