Ahmedabad Plane Crash News: भारतातील अनेक शहरांमधील विमानतळांभोवती दाट लोकवस्तीची ठिकाणे आहेत आणि गुरुवारी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात ज्या इमारतीवर हे विमान कोसळले, तेथील किमान ३० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे विमानतळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एअर इंडियाच्या फ्लाइट १७१ बोईंग ७८७-८ ड्रीमलायनरने सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले आणि फक्त ६२५ फूट उंचीवरून मेघाणी नगरमधील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या संकुलात कोसळले, जे विमानतळापासून दोन किमीपेक्षा कमी अंतरावर आहे. यामध्ये विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आणि मेडिकल कॉलेज संकुलातील किमान ३० जणांचा मृत्यू झाला.
मुंबईतील विमानतळावरून दर तासाला ४० हून अधिक विमाने उड्डाण करतात. हे विमानतळ झोपडपट्ट्यांनी आणि आलिशान घरांनी वेढलेले आहे आणि दोन्ही ठिकाणचे नागरिकांच्या मते, विमानांच्या उड्डाणामुळे त्यांना कधीकधी खूप त्रास होतो.
“आम्ही धावपट्टीपासून १ किमी अंतरावर आहोत. जवळच एक सर्व्हिस रोड आहे जिथे बरेच मासे विक्रेते असतात, अन्नपदार्थ विकणारे इतर फेरीवाले देखील असतात. उरलेले अन्न नंतर तिथे फेकले जाते, ज्यामुळे तेथे पक्षी मोठ्या प्रमाणात गोळा होतात,” असे मुंबई विमानतळाच्या परिसरातील एका रहिवाशाने एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले.
विलेपार्ले (पूर्व) येथील झोपडपट्ट्यांमधील एक रहिवाशांनी सांगितले की, ते अनेक दशकांपासून तेथे राहत आहेत परंतु सरकारने त्यांना राहण्यासाठी सुरक्षित जागा दिली तर ते स्थलांतर करण्यास तयार आहेत.
“नक्कीच, आम्हाला भीती वाटते. पण आम्ही ७० वर्षांहून अधिक काळ इथे राहतोय, आम्ही कुठे जायचे?” असे एकाने म्हटले.
जयपूरमध्येही अशीच परिस्थिती आहे, तिथे विमानतळाजवळ राहणारे लोक म्हणतात की अहमदाबादमधील घटनेमुळे ते हादरले टाकले आहेत. आम्हाला गुरुवारपासून भीती वाटत आहे. विमाने दिवसरात्र उड्डाण करतात,” असे एक महिला म्हणाली.
दरम्यान पाटणा विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांना अशाच प्रकारच्या आपत्तीचा सामना केला आहे आणि असा प्रकार पुन्हा घडू शकतात अशी त्यांना चिंता आहे.
जुलै २००० मध्ये, अलायन्स एअरचे विमान लँडिंग करताना विमानतळाजवळील गरदानी बागेत कोसळले होते, ज्यामध्ये जमिनीवर असलेल्या पाच जणांसह ६० लोक मृत्युमुखी पडले होते.
“ती घटना हे इथेच घडली होती. मला आठवते की, मोठा आवाज ऐकू आला होता. आम्हाला अजूनही थोडी भीती वाटते, पण याला काय अर्थ आहे? आम्हाला इथेच राहावे लागणार आहे”, असे पाटणा येथील एका नागरिकाने एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले.