अमित शाह यांचं शाह हे आडनाव पारशी आहे. मग शहरं आणि गावांची नावं बदलणाऱ्या भाजपाने आता अमित शाह यांचं नाव बदलावं. शाह हे पारशी आडनाव अमित शाह किती दिवस बाळगणार? त्यांनी त्यांचं आडनाव बदलावं असा खोचक आणि तिखट सल्ला एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी दिला आहे. प्रसिद्ध इतिहासकार इरफान हबीब यांनी अमित शाह यांना नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. ज्यानंतर आता असदुद्दीन ओवेसी यांनीही भाजपा आणि अमित शाह यांना शाह हे नाव बदलण्याचा सल्ला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशात शहरांची नावं बदलण्याची पद्धतच सुरु झाली आहे. आग्र्याचं नाव बदललं, अलाहाबादचं नाव बदललं, फैजाबादचं नाव बदललं. मग अमित शाह हे त्यांच्या नावातून शाह कधी हटवणार? शाह हा पारशी शब्द आहे. मूळ इराणी वंशाचे असलेल्या पारशींमध्ये शाह म्हणण्याची प्रथा आहे. अमित शाह यांचं आडनाव गुजराती तर मुळीच नाही असं सांगत इतिहासकार इरफान हबीब यांना नाव बदलण्याचा सल्ला दिला. त्यापाठोपाठ आता असदुद्दीन ओवेसींनीही शाह यांनी आडनाव बदलावं असा सल्ला दिला आहे. इरफान हबीब यांनी गुजरात हे नावही इराणी असल्याचे म्हटले आहे. गुजरातारा असे म्हटले जायचे त्यावरून गुजरात हे नाव पडले आहे. तेदेखील बदलले पाहिजे असे त्यांनी म्हटले होते.

कोणत्या शहरांची नावे बदलली

अलाहाबादचे नाव प्रयागराज आणि फैजाबादचे नाव अयोध्या करण्याचा प्रस्ताव मंत्रालयाला उत्तर प्रदेश सरकारकडून मिळाला होता. ज्या जागांचे नाव बदलण्याच्या प्रस्तावास सरकारकडून मंजुरी मिळालेली आहे. यामध्ये आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजमुंदरीचे राजामहेंद्रवरम, ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील आऊटर व्हिलरला एपीजे अब्दुल कलाम आयलँड, केरळमधील मलप्पुरा जिल्ह्यातील एरिक्कोडला एरिकोड, हरयाणातील जिंद जिल्ह्यातील पिंडारीचे पांडु-पिंडारा नामकरण करायचे आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील लांडगेवाडीला नरसिंहगाव, हरयाणामधील रोहतक जिल्ह्यातील गढी सांपलाचे सर छोटू राम नगर, राजस्थानमध्ये नागौर जिल्ह्यातील खाटू कलागावाला बडी खाटू, मध्य प्रदेशमध्ये पन्ना जिल्ह्यातील महगवां छक्का गावाचे महगवां सरकार आणि महगवां तिलियाचे महगवां घाट, उत्तर प्रदेशमध्ये मुझफ्फरनगरचे शुक्रताल, खादरचे सुखतीर्थ खादर आणि शुक्रताल बांगरचे सुखतीर्थ बांगर करण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aimim chief asaduddin owaisi takes a dig at bjp president amit shah says shah a name of persian origin
First published on: 12-11-2018 at 15:51 IST