Allahabad High Court : अलहाबाद उच्च न्यायालयाने माजी इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस ऑफिसर नितिन नाथ सिंग यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यावर २०२३ मध्ये पत्नी रेणु सिन्हा (पेशाने वकील) यांची हत्या करून अटक टाळण्यासाठी मृतदेह नोएडा येथील घराच्या स्टोअररुमध्ये लपवून ठेवल्याचा आरोप आहे.

न्यायमूर्ती सिद्धार्थ यांच्या खंडपीठाने त्यांना जमीन मंजूर केला, यावेळी त्याने नमूद केले की एक ज्येष्ठ नागरिक आहेत आणि समाजाच्या सुरक्षेसाठी धोका ठरू शकतील असे कोणी अट्टल गुन्हेगार नाहीत.त्यांच्याकडे पुरेशी मालमत्ता आहे आणि ते पळून जाण्याचा धोका नाही हेही खंडपीठाने यावेळी नमूद केले.

खटला दाखल केलेल्या वकीलाच्या म्हणण्यांनुसार, ६४ वर्षीय सिंह यांनी २०२३ च्या सप्टेंबर महिन्यात त्यांचे नोएडा येथील त्यांचे दोन मजली घर विकण्यावरून त्यांच्यात झालेल्या जोरदार वादानंतर कथितपणे पत्नीची गळा आवळून हत्या केली.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान, एक सिगरेट्स आणि एक पाण्याची बाटली घेऊन त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील स्टोअररूममध्ये कथितपणे लपून बसलेल्या सिंह यांना अटक करण्यात आली होती.

या प्रकरणात जामीनाची मागणी करताना आरोपीच्या वकीलांनी दावा केला की, एफआयआर दाखल करण्यासाठी ८ तास उशीर झाला होता, ज्याबद्दल माहिती देणारा अजय कुमार, जो मृत महिलेचा भाऊ देखील आहे, त्याने स्पष्टीकरण दिलेले नाही.

त्यांनी पुढे असाही युक्तीवाद करण्यात आला की, माहिती देणाऱ्याकडून अर्जदाराच्या स्वत:च्या मालकीचे घर त्याच्या नावावर हस्तांतरीत करण्यासाठी दबाव टाकला जात होता. पण अर्जदार आणि त्यांची पत्नी (मृत) यांनी घरची विक्री ४.५ कोटींना करण्याची बोलणी केली होती आणि त्यांना ५५ लाख रुपये earnest money म्हणून मिळाले होते.

त्यामुळे असे सांगण्यात आले की या घटनेत माहिती देणाऱ्याचा सहभाग असण्याची शक्यता होती आणि त्यांच्या पत्नीच्या हत्येमागे तो असू शकतो आणि अर्जदाराच्या अनिपस्थितीत घराची देखभाल या माहिती देणाऱ्याकडे असायची आणि त्याच्याकडे घराच्या चाव्या देखील होत्या.

अखेरीस असाही दावा केला की अर्जदार हा ११ सप्टेंबर २०२३ पासून तुरूंगात आहे. आरोपपत्र १४ ऑक्टोबर २०२३ मध्ये दाखल करण्यात आली आणि याची दखल ऑक्टोबर २०२३ मध्ये घेण्यात आली. खटला अजूनही सुरू करण्यात आलेला नाही.

तर दुसरीकडे जामीनाला विरोध करताना माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या वकीलांनी आणि एजीए यांनी युक्तीवाद केला की, शेजाऱ्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे की अर्जदाराने घटना घडली त्या दिवशी त्याचे घर कधीही सोडले नाही. यामुळे ते गुन्हा घडला तेव्हा घरातच उपस्थित होते या दाव्याला बळकटी मिळते. तसेच यावेळी हेही सांगण्यात आले की त्यांचे त्यांच्या पत्नीबरोबर जिव्हाळ्याचे संबंध नव्हते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व युक्तीवादाच्या पार्श्वभूमीवर कोर्टाने खटल्याच्या मेरिटबाबत कोणतीही टिप्पणी किंवा मत व्यक्त न करता आणि आरोपपत्र आधीच दाखल केले गेले आहे आणि त्याची दखल (ऑक्टोबर २०२३ मध्ये) घेतली गेली आहे हे लक्षात घेऊन, न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.