Alwar Murder Case : राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील मुण्डावर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या सराय कला गावातून एक धक्कादायक बातमी आली आहे. येथील एका इसमाने त्याच्या सहा वर्षीय पुतण्याचा खून केला आहे. खूनाचं कारण समजल्यावर संपूर्ण अलवर जिल्हा हादरून गेला आहे. पोलिसांनी या खुनाची माहिती देताना सांगितलं की सराय कला गावातील मनोज नावाच्या एका इसमाची पत्नी त्याला सोडून गेली आहे. पत्नीला परत आणण्यासाठी त्याची धडपड चालू होती. त्यातच पत्नीला वश करण्यासाठी (तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी) तो मांत्रिकाच्या नादी लागला होता. मांत्रिकाच्या मागणीवरूनच मनोजने त्याच्या पुतण्याचा खून केला आहे.

मांत्रिकाने मनोजला सांगितलं की तो त्याच्या कथित तंत्रविद्येच्या सहाय्याने मनोजच्या पत्नीला परत आणू शकतो. मात्र त्यासाठी एका लहान मुलाचा बळी देऊन त्याचं रक्त व काळीज (हृदय) आणावं लागेल. तांत्रिकावर विश्वास ठेवून मनोजने त्याच्या पुतण्याचा खून केला.

नेमकी घटना काय?

ही १९ जुलैची घटना आहे. मनोजचा पुतण्या, सहा वर्षीय लोकेश बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याच्या पालकांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. कुटुंबातील सर्व सदस्य व पोलीस लोकेशचा शोध घेत होते. त्याचवेळी गावातील एका पडिक घरात जनावरांच्या वैरणीमध्ये (चारा) लोकेशचा मृतदेह सापडला. पोलिसांनी या खूनाचा तपास सुरू केल्यानंतर त्यांना लोकेशच्या चुलत्यावर संशय आला. कारण काही पुरावे त्याच्याकडे बोट करत होते. त्यानंतर पोलिसांनी मनोजला ताब्यात घेतलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस चौकशीत मनोजने सांगितलं की मांत्रिकाने त्याच्या पत्नीवर नियंत्रण मिळवून देण्यासाठी १२ हजार रुपये आणि एका लहान मुलाच्या बळीची मागणी केली होती. त्यानंतर मनोजने लोकेशला लाडीगोडी लावून गावातील एका पडिक घरात नेलं. तिथे गळा दाबून त्याची हत्या केली आणि इंजेक्शनच्या सहाय्याने त्याचं रक्त काढलं. रक्त एका बाटलीत भरलं. त्यानंतर त्याने मृतदेह वैरणीत लपवला जेणेकरून तो नंतर मुलाचं काळीज काढू शकेल. त्याआधीच कुटुंबियांनी लोकेशचा शोध सुरू केला. त्यामुळे दीपकला उर्वरित गोष्टी करता आल्या नाहीत. दरम्यान, पोलिसांनी लोकेशचा मृतदेह शोधून काढला. पोलीस म्हणाले “हे अत्यंत भयंकर व अंधश्रद्धेपोटी केलेलं कृत्य आहे. आम्ही याप्रकरणी अधिक तपास करत आहोत.”