scorecardresearch

Premium

नारायण साई बलात्कार खटल्यातील साक्षीदारावर हल्ला

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांचा मुलगा नारायण साई याच्या विरोधातील बलात्कार खटल्यातील आणखी एका साक्षीदारावर हल्ला करण्यात आला.

asaram bapu, आसाराम बापू, नारायण साई
आसाराम बापूच्या प्रभावात येऊन आपले वडील देवराज कृष्णानी यांनी त्यांची मौल्यवान संपत्ती आसाराम बापूला दान केल्याचा दावा जानकीने केला आहे.

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांचा मुलगा नारायण साई याच्या विरोधातील बलात्कार खटल्यातील आणखी एका साक्षीदारावर हल्ला करण्यात आला. नारायण साई बलात्कार खटल्यातील प्रमुख साक्षीदार असलेल्या महेंद चावला याच्यावर बुधवारी एका अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या करण्याचा प्रयत्न केला.हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यात ही घटना घडली.
आसाराम बापू आणि मुलगा नारायण साई यांच्या विरोधातील बलात्कार खटल्यातील साक्षीदारांवर हल्ला होण्याचे हे सहावे प्रकरण आहे. बुधवारी हरियाणाच्या पानिपत येथे महेंद्र चावलावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्याला त्वरित नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती ठीक असल्याचे पोलीस अधिकाऱयाने सांगितले. तसेच साक्षीदाराच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने त्याला सुरक्षा देखील पुरविण्यात आली आहे. सोबत घडलेल्या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून हल्लेखोराचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
सूरतमधील एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर डिसेंबर २०१३ मध्ये नारायण साईला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगातच आहे. स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूही लैंगिक छळाच्या आरोपांवर जोधपूरच्या तुरूंगात आहेत. या दोघांनीही जामिनासाठी बरीच खटपट करून पाहिली, परंतु त्यांची सुटका होऊ शकलेली नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Another key witness in narayan sai case attacked in haryana

First published on: 13-05-2015 at 04:23 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
मराठी कथा ×