Arvind Kejriwal on Delhi MCD Polls Result 2022: दिल्ली महानगरपालिका निवडणुकीमध्ये मोठं यश मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे. आम्हाला पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद आणि केंद्र सरकारचं सहकार्य हवं आहे, असं केजरीवाल यांनी १५ वर्षानंतर भारतीय जनता पार्टीची महानगरपालिकेतील सत्ता संपुष्टात आणल्यानंतर म्हटलं आहे.

“माझंही तुमच्यावर प्रेम आहे,” अशी आपल्या भाषणाला सुरुवात करत केजरीवाल यांनी मतदारांचे आभार मानले. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने विजयी झाल्यानंतर ‘आप’च्या कार्यकर्त्यांना केजरीवाल यांनी संबोधित केलं. ‘आप’च्या विजयामुळे दिल्लीमध्ये आता डबल इंजिनचं सरकार असणार आहे. २०१५ पासून या ठिकाणी राज्यात ‘आप’ची सत्ता असून आता महानगरपालिकेवरही आपने झेंडा फडकवला आहे.

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
narendra modi
पंतप्रधानांकडून प्रचारात जुनेच मुद्दे; विरोधकांची टीका, मित्रपक्षांचीही भिस्त मोदींवरच

भाजपाने अनेक मार्गावर आमची अडवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. केंद्रातील सरकार, नायाब राज्यपाल आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून भाजपाने आमची अडवणूक केली असं ‘आप’ने म्हटलं आहे. “आम्हाला केंद्र सरकारची मदत हवी आहे. आम्हाला पंतप्रधान आणि केंद्राच्या आशीर्वादाची गरज आहे,” असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. या निवडणुकीमधून लोकांना सकारात्मक राजकारणाची आवश्यकता असून नाकारात्मक राजकारण त्यांनी दूर केलं आहे, असंही केजरीवाल म्हणाले. “मी सर्व पक्ष आणि उमेदवारांना आवाहन करतो की आझपर्यंत आपण राजकीय वाद घातले. मात्र आता आपल्याला एकत्र काम करायचं आहे. आम्हाला भाजपा आणि काँग्रेसचं सहकार्य हवं आहे. आपण एकत्र येऊन दिल्लीतील समस्या सोडवू”, असंही केजरीवाल म्हणाले.

नक्की वाचा >> Delhi MCD Election Result : दिल्ली महापालिका निवडणुकीतील ‘आप’च्या विजयावर मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

दुपारी चार वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार आम आदमी पार्टील १३४ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपाने १०४ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला केवळ नऊ जागा जिंकता आल्या आहेत आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.