सक्तवसुली संचनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. २८ मार्चपर्यंत ते ईडी कोठडीत राहणार आहेत. या कारवाईनंतर झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्याशी नुकतंच बोलले आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. एक मैत्रीण म्हणून मी त्यांचं दुख समजू शकते, अशी पोस्ट कल्पना सोरेन यांनी केली आहे.

CM Eknath Shinde criticizes to Congress leader Rahul Gandhi
मुख्यमंत्री शिंदेंची राहुल गांधींवर खोचक टीका; म्हणाले, “आईच्या पदराला धरुन राजकारण…”
yavatmal, ralegaon, Unknown Assailant , Pelts Stone, Uday Samant, Pelts Stone at Uday Samant's Convoy, Uday Samant s Convoy Vehicle , Campaign Meeting, Pelts stone Uday Samant s Convoy Vehicle,
मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील वाहनावर दगड भिरकावला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यानची घटना
Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा; म्हणाले, “नकली शिवसेना म्हणायला ती तुमची डिग्री आहे का?”
CM Eknath Shinde
“…म्हणून त्यांचा टांगा पलटी करावा लागला”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

देशात सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या असताना देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बेकायदेशीर अटक करणे ही लोकशाहीसाठी सामान्य घटना नाही, असंही त्या म्हणाल्या. संकटाच्या या काळात हेमंत सोरेन यांच्या नेतृत्त्वातील पूर्ण झारखंड केजरीवाल यांच्यासोबत आहे.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक केली होती. ते ३१ जानेवारीपर्यंत ईडी कोठडीत होते.

हेही वाचा >> “मोदींनी अहंकारातून…”, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी व्यक्त केला संताप

अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री उशिरा ईडीने अटक केली. अटकेनंतर आप पक्षाने रात्रीच सर्वोच्च न्यायायलाये दरवाजे ठोठावले. परंतु, शुक्रवारी सकाळी त्यांनी याचिका मागे घेतली. तर शुक्रवारी सकाळीच त्यांना ईडीने ट्रायल कोर्टात हजर केलं. ईडीने त्यांच्या चौकशीसाठी कोर्टाकडे दहा दिवसांचा अवधी मागितला होता. परंतु, कोर्टाने सहा दिवसांची कोठडी देऊ केली आहे. त्यामुळे ते २८ मार्चपर्यंत तुरुंगात राहणार आहेत.

सुनीता केजरीवाल यांची पोस्ट

दरम्यान, सुनीता केजरीवाल यांनी शुक्रवारी सायंकाळी सोशल मीडियावरून त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्या म्हणाल्या, अरविंद केजरीवाल तुरुंगात असो किंवा बाहेर, त्यांचे आयुष्य देशासाठी आणि मातृभूमीसाठी समर्पित केलेले आहे. लोकांनाही याची पूर्ण कल्पना आहे. तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला पंतप्रधान मोदी अंहकारातून चिरडत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

“मोदीजींनी तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला अटक करून सत्तेचा अहंकार दाखवून दिला आहे. ते प्रत्येकाला चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत. ही कारवाई दिल्लीच्या जनतेशी केलेली प्रतारणा आहे. दिल्लीच्या जनतेसाठी त्यांचे मुख्यमंत्री कायम सोबत राहिले होते. ते तुरुंगात असो किंवा बाहेर असो, त्यांनी स्वतःचे आयुष्य देश आणि मातृभूमीसाठी समर्पित केले आहे. जनतेलाही हे माहीत आहे. जय हिंद”, अशी पोस्ट सुनीता अरविंद केजरीवाल यांनी एक्सवर टाकली.