Asaduddin Owaisi on New Parliament Building : देशाच्या नव्या संसदेचं २८ मे रोजी उद्घाटन केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं जाणार आहे. सेंट्रल व्हिस्टा या नावाने हा प्रकल्प ओळखला जातो आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या संसद भवनाचं उद्घाटन करणार असल्याने १९ विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. या सर्व पक्षांनी या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, एका विरोधी पक्षाने मात्र थोडी वेगळी भूमिका घेतली आहे. हा पक्ष म्हणजे असदुद्दीन ओवैसी यांचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्ष अर्थात एआयएमआयएम.

एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या इमारतीचं उद्घाटन करू नये. तसं केल्यास ही घटना म्हणजे थिअरी ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर्सचं उल्लंघन ठरेल. देशाची संसद स्वतंत्र आहे. तिथल्या कार्यकारींपासून देशाची संसद स्वतंत्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा राष्ट्रपती असतील ते संसदेतले कार्यकारी आहेत. परंतु आपल्या देशाची संसद यांच्यापासून स्वतंत्र आहे. देशाच्या न्यायपालिकेपासून ती मुक्त आहे. म्हणून पंतप्रधान मोदी किंवा राष्ट्रपतींनी संसदेच्या इमारतीचं उद्घाटन करू नये.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, पंतप्रधानांनी नव्या संसदेचं उद्घाटन केलं तर तो लोकसभेच्या अध्यक्षांच्या कामात अडथळा ठरेल. या कार्यक्रमाबद्दल सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षांशी संपर्क साधला नाही. त्यांनी आमच्याशी संपर्क का साधला नाही हे त्यांना विचारा. कारण त्यांच्या नजरेत आम्ही अस्पृश्य आहोत. जे लोक मागणी करत आहेत की, संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं तेदेखील चुकीचं आहे. तुम्ही त्यासाठी कलम ५३ (१) वाचा. ते वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीच करायला हवं.

हे ही वाचा >> “…तर २०२४ ला मोदी सरकार येणार नाही”, अरविंद केजरीवालांनी सांगितलं कारण; म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, मी नरेंद्र मोदींना विनंती करतो की, त्यांनी माघार घ्यावी आणि ओम बिर्ला यांना संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करू द्यावं. तुम्ही या देशाचं संविधान मान्य करता हे तुमच्या कृतीतून दिसू द्या.