हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या एका ट्वीटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ओवैसी यांनी २३ जुलै रोजी एका वर्तमानपत्राचा दाखला देत ट्वीट केलं होतं, ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं की इंटेलिजन्स ब्युरो या संस्थेत कोणत्याही वरिष्ठ पदावर मुस्लीम अधिकारी नाही. भारतीय जनता पार्टी मुस्लिमांकडे संशयाच्या नजरेने पाहते. हा त्याचाच परिणाम आहे. आयबी (इंटेलिजन्स ब्युरो) आणि रॉ (रीसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग) या दोन्ही संस्था आता पूर्णपणे बहुसंख्यांकाच्या संस्था बनल्या आहेत. कारण हे लोक सातत्याने मुस्लिमांकडे त्यांच्या निष्ठेचे पुरावे मागत आहेत. तसेच त्यांना बरोबरीचा दर्जा दिला जात नाही.

असदुद्दीन ओवैसी यांच्या या ट्वीटनंतर त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे. कवी कुमार विश्वास यांनीदेखील या ट्वीटवर आक्षेप घेतला आहे. कवी कुमार विश्वास यांनी ओवैसी यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, वकीलसाहेब, तुम्ही म्हणताय तर मग ठीक आहे. फक्त दोन गोष्टी सांगा. इस्लाम आणि भारत या दोनपैकी एक गोष्ट निवडण्याची वेळ आली तर तुम्ही काय निवडाल? तसेच कुरान शरीफ आणि संविधान यापैकी एक गोष्ट निवडण्याची वेळ आली तर तुम्ही काय निवडाल? तुमच्या उत्तराच्या प्रतीक्षेत असलेला एक भारतीय सनातनी.

हे ही वाचा >> सीमा, अंजू… अशी कोणती परिस्थिती परदेशातील प्रियकराकडे नेते ? काय असू शकतात कारणे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या ट्वीटवर लोकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आणखी एक ट्वीट करून स्पष्टीकरण दिलं आहे. ओवैसी यांनी म्हटलं आहे की, भारताचं हेरखातं आणि तपास यंत्रणांमधील मुस्लीम अधिकाऱ्यांविषयी केलेल्या माझ्या ट्वीटवर अनेकांनी आक्षेप घेतले. मुस्लिमांना विचारलं जातं, धर्म आणि देश यापैकी कोणत्या गोष्टीची निवड कराल? त्याचवेळी असे अनेक लोक आसपास आहेत जे देशाच्या सुरक्षेचा सौदा करताना पकडले गेले आहेत. आयएसआयवाले महिलांचे फेक अकाउंट बनवून या लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात. धर्माची गोष्ट लांब राहिली. कोणीतरी त्यांना विचारा की, ते वासना आणि देश यापैकी कशाची निवड करतात?