गाझियाबादमधील दसना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरसिंहानंद सरस्वती यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले होते. गाझियाबादच्या पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- “मोदीभक्त माझ्या ‘पीएचडी’शी तुलना करू शकत नाहीत”; सुब्रमण्यम स्वामी बोलले खरे, पण…
महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह विधान
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यती नरसिंहानंद सरस्वती यांचा १३ जुलै रोजीचा दोन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नरसिंहानंदांनी महात्मा गांधीजींबद्दल अनेक अपमानास्पद शब्द वापरले आहेत. एक कोटी हिंदूंच्या हत्येला महात्मा गांधी जबाबदार धरलं आहे. एवढचं नाही तर हिंदूंच्या दुर्दशेसाठीही महात्मा गांधींना जबाबदार असल्याचं महंतांनी म्हणलं आहे.
समाजातील शांतता, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते.
नरसिंहानंद यांच्या विधानानंतर समाजातील शांतता, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. त्यामुळे त्यांच्यावर गाझियाबाद जिल्ह्यातील मसुरी पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम १५३ए आणि ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.