नागाव जिल्ह्यात उलुनानी येथे बस दरीत कोसळून पाच महिलांसह नऊ जण ठार तर २४ जण जखमी झाले. ही बस लखीमपूर जिल्ह्यातून प्रवाशांना घेऊन गुवाहाटीला जात होती. ती बस छोट्या पुलाच्या कठड्यावर आदळून पहाटे दीडच्या सुमारास खोल खड्ड्यात कोसळून हा अपघात झाला, असे पोलिस अधीक्षक अरिबदा कलिता यांनी सांगितले.
बस चालकासह आठ जण जागीच ठार झाले. एक महिला जखमी झाली होती तिचे रूग्णालयात निधन झाले. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाच जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना कलिता येथील गुवाहाटी मेडिकल कॉलेज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाचलेल्या प्रवाशांना खास बसने गुवाहाटीला पाठवण्यात आले, त्यानंतर ते गुवाहाटीहून रेल्वेने दिल्लीला जाणार होते. मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 27th Oct 2014 रोजी प्रकाशित
बस उलटून ९ ठार
नागाव जिल्ह्यात उलुनानी येथे बस दरीत कोसळून पाच महिलांसह नऊ जण ठार तर २४ जण जखमी झाले. ही बस लखीमपूर जिल्ह्यातून प्रवाशांना घेऊन गुवाहाटीला जात होती.
First published on: 27-10-2014 at 02:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assam nine killed 26 injured as night bus falls into rive in nagaon district