scorecardresearch

धक्कादायक! अमेरिकेत ट्रकमध्ये आढळले ४० मृतदेह

सॅन अंटोनिओ या भागात एका ट्रकमध्ये तब्बल ४० पेक्षा जास्त लोकांचे मृतदेह सापडले आहेत.

death
(प्रातिनिधिक छायाचित्र)

मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये शाळा तसेच सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. या गोळीबारामध्ये आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. असे असतानाच आता अमेरिकेतील टेक्सासमध्ये हादरवून टाकणारी घटना घडली आहे. येथील सॅन अंटोनिओ या भागात एका ट्रकमध्ये ४० पेक्षा जास्त मृतदेह सापडले आहेत. या मृत व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

हेही वाचा >>> करडय़ा यादीतून बाहेर पडण्याची पाकिस्तानची धडपड

टेक्सासमधील केएसएटी या वृत्तवाहिनीने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार सॅन अंटोनिओ शहरातील दक्षिणेकडे एका रेल्वे रुळाच्या बाजूला ट्रकमध्ये एकूण ४२ मृतदेह सापडले आहेत. याबाबत स्थानिक पोलिसांना विचारले असता त्यांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही.

हेही वाचा >>> फॅक्ट चेकिंग वेबसाईटच्या सहसंस्थापकांना दिल्ली पोलिसांकडून अटक, थेट राहुल गांधींनी घेतली दखल, म्हणाले….

केएसएटी या वृत्तावाहिनीच्या पत्रकाराने या घटनेचे काही फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मोठ्या ट्रकच्या बाजूला काही रुग्णवाहिका तसेच पोलिसांच्या गाड्या दिसत आहेत. मात्र एकाच वेळी तब्बल ४२ जणांचा मृत्यू झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या लोकांचा मृत्यू का झाला? हा नैसर्गिक मृत्य आहे की हत्या? हे स्पष्ट झाले नसून टेक्सास आणि सॅन अंटानिओ पोलीस अधिक तपास करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: At least 40 found dead in tractor trailer in texas america prd

ताज्या बातम्या