उत्तर प्रदेशमधील कुख्यात माफिया आणि त्यानंतर राजकारणात आलेल्या अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलीस दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी प्रयागराजमधील कॉल्विन वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जात होते. महाविद्यालयाच्या बाहेर गोळ्या झाडून दोघांची हत्या करण्यात आली. हल्लेखोर हे माध्यमांचे प्रतिनिधी बनून इतर पत्रकारांमध्ये मिसळून अतिकसमोर गेले. अतिक बोलत असताना तीन हल्लेखोरांनी अतिक आणि अशरफच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. दोघेही जागीच ठार झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या हत्याकांडापासून अतिक अहमद देशभर चर्चेत आहे. परंतु तो उत्तर प्रदेशात खूप लोकप्रिय होता. तो पाचवेळा आमदार आणि एकदा खसदार म्हणून निवडून आला होता. १९८९ ते २००२ पर्यंत तो चार वेळा अलाहाबाद पश्चिम मतदार संघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आला होता. २००२ मध्ये तो समाजवादी पार्टीच्या तिकीटावर या मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आला. त्यानंतर त्याने सपाला रामराम करत स्वतःचा ‘अपना दल’ नावाचा नवा पक्ष स्थापन केला. २००४ मध्ये तो पुन्हा एकदा याच मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आला. २००९ साली तो समाजवादी पार्टीच्या तिकीटावर फुलपूर मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आला होता.

त्यानंतर तो २०१९ मध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदार संघ असलेल्या वाराणसीतून लोकसभेसाठी उभा राहिला. अतिकने नॅनी सेंट्रल जेलमध्ये असताना मोदींविरोधात निवडणुकीचा अर्ज दाखल केला होता. परंतु त्यावेळी अतिकला केवळ ८३३ मतं मिळाली होती. तर नरेंद्र मोदींना तब्बल ६,७४,६६४ मतं मिळाली होती. अतिक तेव्हा म्हणाला होता की, त्याला वाराणसीत लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल.

हेही वाचा >> “वैद्यकीय चाचणीची वेळ रात्री १० ची, सगळे हल्लेखोर…”, अतिकच्या हत्येवर कपिल सिब्बल यांचे आठ प्रश्न

निवडणूक लढण्यासाठी अतिकने त्यावेळी न्यायलयाकडे पॅरोलची मागणी केली होती. परंतु ती मागणी न्यायालयाने फेटाळली होती. अतिक प्रचारासाठी तुरुंगातून बाहेर पडू शकला नाही. तरीदेखील त्याला ८३३ मतं मिळाली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atique ahmed lok sabha election 2029 against narendra modi from varanasi asc
First published on: 18-04-2023 at 17:03 IST