एकीकडे जगभरात करोनावरील लस शोधण्यासाठी संशोधक दिवस-रात्र मेहनत करत असताना योगगुरु रामदेव बाबा यांनी आपल्याला औषध सापडलं असल्याचा दावा केला आहे. रामदेव बाबा यांनी दावा करताना म्हटलं आहे की, आपल्याला करोनावर औषध सापडलं असून रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९९.९ टक्के आहे. एका वृत्तावाहिनीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामदेब बाबा यांनी यावेळी सांगितलं की, “आमच्या मुख्य औषधांमध्ये श्वासारी असून करोनाला रोखण्यासाठी तसंच गुंतागुंत सोडवण्यासाठी वापरत आहोत. याशिवाय गिलॉय धनवटी, तुलसी धनवटी आणि अश्वगंधा कॅप्सूल यांचा समावेश आहे. अशी आमची चार मुख्य औषधं आहेत. सर्दी, ताप तसंच इतर ज्या काही अडचणी निर्माण होतात त्यावर आम्ही नियंत्रण मिळवलं आहे. तसंच बरं होण्याचा प्रमाणही जबरदस्त आहे. मृत्यूदरही शून्य आहे”.

आणखी वाचा- भारतात करोना उपचारामध्ये होऊ शकतो महत्वाचा बदल, ‘या’ गोळीचा वापर थांबवणार?

“आपलं औषध करोना झाल्यानंतर त्याला संपवण्यासाठी आहे. आतापर्यंत आमची चार औषधं आणली आहेत. करोनाची लागण झाल्यानंतर बरे होण्यासाठी औषध म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो,” अशी माहिती रामदेव बाबा यांनी दिली आहे. याआधीही रामदेव बाबा यांनी व्हायरसवर आपल्याकडे उपचार उपलब्ध असल्याचा दावा केला होता. माझी औषधे १०० टक्के परिमाणकार ठरतील असंही त्यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba ramdev claims that he has the treatment for the novel coronavirus sgy
First published on: 13-06-2020 at 14:22 IST