निवडणुका जशा जवळ येत आहेत तशा सवंग मागण्या आणि घोषणा सुरू झाल्यात. नरेंद्र मोदी जर पंतप्रधान झाले तर त्यांनी सर्व कर रद्द करावेत. एकच बँक व्यवहार कर ठेवावा, अशी मागणी योगगुरू रामदेवबाबा यांनी केली आहे. हा करदेखील १ ते २ टक्के हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसच्या लोकविरोधी धोरणांमुळे देशाचे नुकसान झाल्याचा आरोप करत, रामदेवबाबांनी मोदींना पाठिंबा दिला आहे. येथील तालकोटरा मैदानावर रविवारी सभेचे आयोजन रामदेवबाबांनी केले आहे. त्यात मोदींसह भाजपचे नेतेही सहभागी होणार आहेत. परदेशातील सर्व काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन दिले तर मोदींना पाठिंबा देऊ असे रामदेवबाबांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.