विश्व हिंदू परीषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी राम मंदिर आंदोलनाचा भाग असणाऱ्या आणि बाबरी मशीद पाडण्याच्या मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या चार नेत्यांना केंद्रामध्ये राम मंदिराच्या नावाने सत्तेत आलेल्या सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी केलीय. या चार जणांमध्ये शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचाही समावेश असून त्यांच्यासहीत अशोक सिंघल, गोरख पीठाधीश्वर अवेद्यनाथजी, रामचंद्र परमहंस यांनाही भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी तोगडीया यांनी केलीय. आज ६ डिसेंबर असून आजच्याच दिवशी २९ वर्षांपूर्वी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये पत्रकरांशी संवाद साधताना तोगडीया यांनी ही मागणी केलीय.

नक्की वाचा >> “मिलिंद नार्वेकरांचं ‘मातोश्री’शी भांडण झालं की काय?, कळत नाही!”

Patanjali
“जाहिरातींच्या आकाराएवढा माफीनामा छापला का?” रामदेव बाबांना SC ने फटकारले; न्यायमूर्ती म्हणाल्या “मायक्रोस्कोप घेऊन…”
Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
solapur, Extortion Case, Traders Forced to Pay, Ambedkar Jayanti Celebration, Traders Forced to Pay Ambedkar Jayanti, dr baba saheb ambedkar jayanti, police case,
सोलापूर : जयंती उत्सवाच्या वर्गणीच्या नावाने खंडणी मागितल्याने दोघांवर गुन्हा
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा

तोगडीया यांनी राम मंदिर आंदोलनासंदर्भात बोलताना बाबरी पाडल्याचा गर्व आहे असंही म्हटलंय. “आपला जन्मही झाला नव्हता तेव्हापासून हिंदू लढत होते. शौर्य दाखवत होते. संघर्ष करत होते. त्यापैकी ६ डिसेंबरचं शौर्य हे तीन मुद्द्यांसाठी अद्वितीय आहे. आम्हाला गर्व बाबरी पाडण्यावर. जिथे एकेकाळी मशीद होती तिथे मंदिर उभारलं याचा आम्हाला गर्व आहे. मी यामध्ये माझ्या आयुष्याची ३२ वर्षे, डॉक्टरकीचा पेशा आणि त्यामधून मिळाला असते असे कोट्यावधी रुपये मी या कामासाठी सोडून दिल्याचा मला गर्व आणि आनंद आहे. माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी करियर, पैसे बनवण्यासाठी जाण्याऐवजी रामाच्या जन्मभूमीमध्ये मंदिर बनवण्यासाठी पुढे आले याचा मला गर्व आहे,” असं तोगडीया म्हणालेत.

“चार लोकांचं नेतृत्व नसतं तर बाबरी पडली नसती आणि मंदिर उभं राहिलं नसतं. यापैकी पहिले आहेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दुसरे आहेत अशोक सिंघल. तिसरे योगी आदित्यनाथ यांचे गुरु गोरख पीठाधीश्वर महंत अवैद्यनाथजी. चौथे होते अयोध्येचे रामचंद्र परमहंस,” असं तोगडीया यांनी सांगितलं.

“या चौघांसोबत माझं खास नातं आहे. या चौघांना जोपर्यंत भारतरत्न मिळत नाही तोपर्यंत मी म्हणेल की भारत सरकारने राम मंदिर आंदोलनाचा सन्मान केलेला नाही. या चौघांनाही भारतरत्न जाहीर करा आणि ज्या राम मंदिराच्या नावावर सत्ते आला आहात त्याची ऋणमुक्ती सत्तेत असलेल्यांनी प्राप्त करावी,” असं तोगडीयांना म्हटलं आहे.