काठमांडू : ‘आदिपुरुष’ या चित्रपटातील संवादांमुळे वाद निर्माण झाल्यामुळे, या चित्रपटासह सर्व हिंदी चित्रपटांवर नेपाळमध्ये सोमवारी बंदी घालण्यात आली. सीतेचा उल्लेख ‘भारताची कन्या’ असा करण्यात आल्याबाबत नेपाळला आक्षेप आहे.

रामायण या महाकाव्याचे कथात्मक रूपांतर असलेल्या या चित्रपटावर काठमांडू व पोखरामध्ये बंदी घालण्यात आल्यानंतर, त्याचे देशभरातील प्रदर्शन थांबवण्यात आले असल्याचे वृत्तांमध्ये म्हटले आहे. कुठलाही हिंदी चित्रपट प्रदर्शित केला जाणार नाही हे निश्चित करण्यासाठी काठमांडूतील १७ चित्रपटगृहांमध्ये पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

सीतेचा जन्म दक्षिण नेपाळमधील जनकपूरमध्ये झाला, अशी मान्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.