Bangladeshi woman lands in jail after she crosses international border to meet Indian boyfriend : प्रेमासाठी लोक अनेकदा मोठे-मोठे धोके पत्कारताना आपण पाहतो, असाच काहीसा प्रकार नुकताच समोर आला आहे. आठ महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या व्यक्तीच्या प्रेमात एक बांगलादेशी महिला चक्क भारतात आल्याची घटना घडली आहे. मात्र तीचं प्रेम शेवटापर्यंत पोहचू शकलं नाही आणि तिला आता त्रिपुरामधील तुरूंगाची हवा खावी लागत आहे. इतकेच नाही तर ती ज्या कर्नाटकमधील ज्या बॉयफ्रेंडला भेटायला ती आली होती त्याला देखील न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुलशन अख्तर ही बांगलादेशमघील बोगुरा जिल्ह्यातील पालसा गावतील रहिवासी असून ती कर्नाटकातील दत्ता यादव या व्यक्तीला भेटाण्यासाठी भारतात आली होती. या दोघांची ओळख इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. ओळख झाल्यानंतर हळूहळू त्यांच्यात नातं तयार झालं आणि हे दोघे एकमेकांना मेसेज, फोटो पाठवत असताना आणि व्हिडीओ कॉलवर गप्पा मारताना एकमेकांच्या प्रेमात अजूनच खोलवर बुडाले.

व्हर्च्युअली जुळलेलं हे प्रेम इतकं पुढे गेलं की दोघांनी एकमेकांना प्रत्यक्षात भेटण्याचा निर्णय घेतला. यासाठी गुलशनाने धडसी निर्णय घेतला आणि या निर्णयामुले तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आहे.

बुधवारी गुलशानाने फक्त भारतातील दत्ताला भेटण्यासाठी आंतरराष्ट्रीय बॉर्डर ओलांडली. अनेक धोके आहेत माहिती असून देखील न घाबरता, कुठल्याही परिणामांची चिंता न करता भारतात आली. तर दुसरीकडे दत्ता देखील बंगळुरूहून सेपहिजाला जिल्ह्यात बांग्लादेश-भारत सीमेवर असलेले गाव हरिहोरदुला या गावात पोहचला, असे पोलिसांनी सांगितले.

इतके महिने वाट पाहिल्यानंतर त्यांची अखेर भेट झाली, या जोडप्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण होता पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. लवकरच त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.

बीएसएफला या दोघांच्या उपस्थितीबद्दल माहिती मिळाली आणि त्यांना लगेचच ताब्यात घेण्यात आले. यानंतर त्यांना माधुपूर पोलीस ठाण्यात सोपवण्यात आले.

गुरूवारी या दोघांना न्याययलयासमोर हजर केले असता कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

पोलिसांनी पासपोर्ट अॅक्ट, फॉरेनर्स अॅक्ट आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियकराला भेटण्याच्या ओढीने भारतात आलेली गुलशना ही त्रिपुरामधील तुरूंगाच्या एका कोठडीत येऊन पडली. दरम्यान पोलिसांनी भारतात येण्यासाठी तिची मदत करणाऱ्या कथित मानवी तस्करीच्या नेटवर्कची चौकशी सुरू केली आहे