भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांना काल रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने येथील बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जगमोहन दालमियांची प्रकृती नाजूक होती. अखेर गुरुवारी रात्री अचानक छातीत दुखू लागल्याने दालमिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, दालिमियांची माहिती मिळताच पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री अरुप बिस्वास यांच्यासह बंगाल क्रिकेट बोर्डाच्या काही पदाधिका-यांनी बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये दाखल झालेत. त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या दालमिया यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये एखाद दुसऱ्या बैठकीतचं सहभाग घेतला होता.
संग्रहित लेख, दिनांक 18th Sep 2015 रोजी प्रकाशित
बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमियांना हृदयविकाराचा झटका
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांना काल रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने येथील बी. एम. बिर्ला हार्ट
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 18-09-2015 at 09:44 IST
TOPICSजगमोहन दालमिया
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci chief jagmohan dalmiya suffers heart attack undergoes surgery