Bengaluru rape case 22-year-old engineering student Arrested : बंगळुरू येथील एका खासगी महाविद्यालयात विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान त्याच्याच कॉलेजात शिकणाऱ्या एका सिनियर विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका २२ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. या विद्यार्थ्याने १० ऑक्टोबर रोजी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत पीडितेला आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पाच दिवसांनंतर उजेडात आले जेव्हा पीडितेने तिच्या पालकांना याबद्दल माहिती दिली आणि त्यानंतर हनुमंथनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

हनुमंथनगर पोलीसांनी जीवन गोवडा (२२) या पाचव्या सेमिस्टरमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याला कथित अत्याचार प्रकरणात बुधवारी अटक केली. सध्या हा तरूण न्यायालयीन कोठडीत आहे.

एफआयआरनुसार पीडिता ही सकाळी ८.५५ वाजता कॉलेजात आली आणि तिने जीवन याला काहीतरी वस्तू घेण्यासाठी ती दुपारी त्याला भेटेल असे सांगितले.

आरोपीने कथितरणे तिच्याशी आपल्याला बोलायचे असल्याचे सांगत राहिला आणि लंच ब्रेक दरम्यान सतत तिला फोन करत राहिला. जेव्हा पीडित तरुणी त्याला भेटायला खाली गेली तेव्हा त्याने तिला सातव्या मजल्यावरील आर्किटेक्चर ब्लॉक जवळ येण्यास सांगितले, जेथे त्याने तिला किस करण्याचा प्रयत्न केला.

“जेव्हा तिने विरोध केला आणि तेथून जाण्याचा प्रयत्न केला त्याने बळजबरीने तिला फरफटत सहाव्या मजल्यावरील पुरुषांच्या शौचालयात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला,” असे अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेदरम्यान फोन वाजल्याने आरोपीने पीडित तरुणीचा मोबाईल फोन काढून घेतल्याचेही सांगितले जात आहे.

सुरूवातीला बसलेल्या धक्क्यामुळे पीडिता प्रशासनाकडे जाऊ शकली नाही, मात्र नंतर तिच्या पालकांच्या पाठिंब्याने तिने तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक टेस्ट सुरू केल्या . मात्र ही घटना ज्या मजल्यावर घडली तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने या प्रकरणाता तपास गुंतागुंतीचा बनला.

“पीडित तरूणी आणि आरोपी हे दोघेही एकमेकांना ओळखत होते आणि एकाच संस्थेत शिकत होते, पण अकॅडमीक बॅकलॉग्समुळे जीवन हा एक वर्ष मागे पडला होता,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा

या घटनेनंतर तरूणीने सांगितले की तीने तिच्या मैत्रिणींना हा प्रकार सांगितला, ज्यांनी तिला पालकांना हा प्रकार सांगण्यास प्रोत्साहन दिले. इतकेच नाही तर आरोपीने तिला फोन करून तिला गोळी हवी आहे का असेही विचारले, पण तिने फोन कट केला.

भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.