संसदेच्या सुरक्षेचा भंग होईल अशी कृती केलेली नाही असे आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांनी स्पष्ट केले आहे. संसद भवनात नीतिमत्ता समितीच्या सहसचिवांना याबाबत मान यांनी पत्र लिहिले आहे. संसद भवन परिसराचे चित्रण केल्याप्रकरणी मान यांना समितीचा अहवाल सादर होईपर्यंत सभागृहात उपस्थित राहू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांनी गुरुवारी आपल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच या समितीपुढे ते उपस्थित राहिले. सोमवारी त्यांनी पुन्हा हजर राहण्यास सांगण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान पठाणकोट हल्लाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही चौकशी करावी या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला पठाणकोटला घटनास्थळी भेट देण्यास परवानगी दिल्यावरून पंतप्रधानांच्या चौकशीची मागणी मान करत आहेत. पंतप्रधानांना असे चौकशीला बोलावणे हे समितीच्या कार्यकक्षेबाहेरचे आहे असे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात पंतप्रधानांना ओढल्याने मान यांच्यापुढील अडचणी वाढू शकतात असे मानले जात आहे. मान यांची चौकशी करणाऱ्या ९ सदस्यीय समितीचे प्रमुख भाजप खासदार किरीट सोमय्या आहेत.

 

भाजपच्या पासवानांची खासदारकी रद्द

एक्स्प्रेस वृत्तसेवा, पाटणा

बिहारच्या सासाराम मतदारसंघातील भाजप खासदार छेदी पासवान यांचे सदस्यत्व पाटणा उच्च न्यायालयाने रद्द ठरवले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात काही माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या गुन्ह्य़ांची नेमकी माहिती दिली नसल्याचा ठपका ठेवत याचिका दाखल करण्यात आली होती. या निकालाविरोधात दाद मागणार असल्याचे पासवान यांनी स्पष्ट केले आहे. माझ्याकडे लपविण्यासारखे काही नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी निकालानंतर व्यक्त केली आहे.

 

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagwant mann again says he did no wrong
First published on: 29-07-2016 at 01:51 IST