भारत बायोटेकने शुक्रवारी COVAXIN लसीचे उत्पादन तात्पुरते कमी करण्याची घोषणा केली. लस खरेदी करणाऱ्या एजन्सींना पूर्ण पुरवठा केला असून पुढे लसीची मागणी कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं कंपनीने म्हटलंय. तसेच येत्या काळात कंपनी प्रलंबित सुविधा, प्रक्रिया आणि सुविधा ऑप्टिमायझेशन यावर लक्ष केंद्रित करेल, असं सांगण्यात आलंय.

COVID-19 च्या सार्वजनिक आरोग्य आणीबाणीला तोंड देण्यासाठी, COVAXIN च्या निर्मितीसाठी, मागील वर्षभरात सतत उत्पादनासह, सर्व विद्यमान सुविधांचा पुनर्वापर करण्यात आल्याने बऱ्याच गोष्टी बाकी राहिल्या होत्या. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अशा परिस्थितीत आता अपग्रेडची गरज आहे. उत्पादनादरम्यान काही चांगल्या उपकरणांची गरज होती, मात्र करोनामुळे ते उपलब्ध होऊ शकले नाही, असे कंपनीने म्हटले आहे. परंतु तरीही कंपनीने कधाही करोनाच्या लसीच्या गुणवत्तेशी तडजोड केली नाही. येत्या काळात सुधारणा केल्यानंतर लसीचे उत्पादन आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे, असं कंपनीने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलीकडील WHO नंतर EUL तपासणी दरम्यान, भारत बायोटेकने नियोजित सुधारणा उपक्रमांच्या व्याप्तीवर WHO टीमशी सहमती दर्शवली आहे. तसेच ते शक्य तितक्या लवकर अंमलात आणले जातील, असंही कंपनीने म्हटलंय. लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, करोना विरुद्ध स्वदेशी लस कोवॅक्सीन ७७.८ टक्के प्रभावी ठरली आहे.