Odisha IAS Officer Beaten by BJP Worker: ओडिशाची राजधानी भुवनेश्वरच्या महानगर पालिकेचे (BMC) अतिरिक्त आयुक्त रत्नाकर साहू यांनी आपल्या कार्यालयात जनता दरबार घेतला असताना काही लोकांनी त्यांना जबर मारहाण केली. पाच ते सहा लोक त्यांच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी साहू यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांना फरफटत महानगरपालिकेच्या कार्यालयातून बाहेर आणले आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण करणारे भाजपाचे कार्यकर्ते, नेते असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक झाली आहे.

आयुक्तांना जबर मारहाण

भुवनेश्वर महानगरपालिकेचे (BMC) आयुक्त रत्नाकर साहू कार्यालयात जनता दरबार घेत असताना काही कार्यकर्ते आत घुसले आणि त्यांनी आयुक्तांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, काही युवक आयुक्तांना लाथा-बुक्क्या घालत आहेत. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तीन लोकांना ताब्यात घेतले.

आयुक्तांवर हल्ला का?

आयुक्त रत्नाकर साहू यांनी भाजपा नेते जगन्नाथ प्रधान यांचा अपमान केला, असा आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी हल्ला केला. या घटनेनंतर आता ओडिशा प्रशासकीय सेवा संघाने सामूहिक आंदोलन छेडले आहे.

आयुक्त काय म्हणाले?

आयुक्त रत्नाकर साहू यांनी झालेल्या प्रकाराबाबत म्हटले, सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मी तक्रार निवारण करण्यासाठी जनता दरबार घेत होतो. यावेळी काही लोक माझ्या दालनात घुसले. आत येताच त्यातील एका नगरसेवकाने विचारले की, मी जगन्नाथ भाईंशी गैरवर्तन केले आहे का? पण मी नकार देताच त्यांनी अचानक हल्ला केला. त्यांनी मला फरफटत दालनाबाहेर नेले. तिथे मारहाण केली. तसेच मला बळजबरीने त्यांच्या गाडीत कोंबण्याचाही प्रयत्न केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि बिजू जनता दल (बीजेडी) पक्षाचे प्रमुख नवीन पटनायक म्हणाले की, अतिरिक्त आयुक्तांना झालेली क्रूर मारहाण निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री मोहन माझी यांनी दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच या हल्ल्यामागे ज्यांचा हात आहे, त्यांनाही शासन करावे.