Bilawal Bhutto on terrorist Masood Azhar : पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी) पक्षाचे नेते बिलावल भुट्टो झरदारी यांनी आणखी एक दावा केला आहे जाची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अल जझीराला या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी इस्लामाबादला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर हा नेमका कुठे दडून बसला आहे याबद्दल कल्पना नसल्याचे भुट्टो म्हणाले आहेत. इतकंच नाही तर भारताने तो पाकिस्तानी भूमिवर असल्याची विश्वसनीय पुरावे दिल्यास पाकिस्तान त्याला अटक करेल असा दावा देखील त्यांनी केला आहे.

भुट्टो यांचा पक्ष सध्या पाकिस्तानात सत्तेत असलेल्या युतीचा भाग आहे. भुट्टो म्हणाले की, ” जर भारत सरकारने तो पाकिस्तानच्या भूमित असल्याची माहिती आम्हाला दिली, तर आम्ही त्याला आनंदाने अटक करू.” पुढे बोलताना त्यांनी भारताने अद्याप अशी माहिती दिली नसल्याचाही दावा केला आहे.

युनायटेड नेशन्सने २०१९ मध्ये त्याला जागतिक दहशतवादी जाहीर केले आहे, आणि त्याला १९९९ साली कंदाहर विमान अपहरणाच्या वेळी सोडून देण्यात आले होते.

भुट्टो यांनी दावा केला की अझहर याचा अफगान जिहादमध्ये सहभागी असल्याने, पाकिस्तानच्या मते तो अफगाणिस्तानात असू शकतो. “अफगाणिस्तानमध्ये जे नाटो करू शकले नाही ते पाकिस्तानसाठी शक्य नाही. या संबंधित कोणीतरी सक्रिय असावं असं वाटण्याचं काहीही कारण नाही,” असे पाश्चिमात्य देशांची अफगाणिस्तानातून माघार आणि तेथे तालिबान सत्तेत परत येणे याला उद्देशून भुट्टो म्हणाले.

जेव्हा पाकिस्तान भारताने कारवाई करण्याची वाट का पाहात आहे असे विचारले असता, भुट्टो यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी सहकार्याकडे बोट दाखवले, जेथे वेगवेगळे देश संशयितांच्या याद्यांची देवाणघेवाण करतात. “याच प्रकारे आम्ही लंडन, न्यू यॉर्क आणि पाकिस्तान येथील हल्ले उधळून लावले,” असे भुट्टो म्हणाले.

लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चा संस्थापक हाफिज सईद हा पाकिस्तानात मोकळा फिरत असल्याचा दावा करणाऱ्या न्यू यॉर्क टाईम्सच्या रिपोर्टबद्दल देखील त्यानी भाष्य केलं. “वास्तविक पाहात हे खरे नाही. हाफिज सईद पाकिस्तानी सरकारच्या ताब्यात आहे,” असे भुट्टो म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर देत एप्रिल महिन्यात झालेल्या ऑपरेशन सिंदूर राबवले होते, या पार्श्वभूमीवर भुट्टो यांचे हे विधान समोर आले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओके मधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. ज्यामध्ये बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचा तळ आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय यांचाही समावेश होता. तसेच भारताच्या हल्ल्यात मसूद अजहर याच्या कुटुंबातील दहा सदस्य आणि चार सहकारी ठार झाल्याचे समोर आले होते.