पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर भाजपावर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या आधी एका धार्मिक कार्यक्रमाचे भाजपाकडून राजकारण करण्यात येत आहे. तसेच भाजपा पक्ष महिला विरोधी आहे, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याऐवजी ममता बॅनर्जी यांनी आज ‘संहती मोर्चा’ काढला. संहती म्हणजे सर्व धर्मांना एकच मानने. या मोर्चातून ममता बॅनर्जी यांनी सर्वधर्म समभावाचा संदेश दिला.

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली नसली तरी त्यांनी भाजपावर निशाणा साधला. भाजपाने प्रभू श्रीरामाचा जयजयकार करत असताना सीतामाताला मात्र बाजूला सारले, अशी टीका त्यांनी केली.

अयोध्येतून येताच पंतप्रधान मोदींचा पहिला मोठा निर्णय; “एक कोटी घरांवर…”

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “ते (भाजपा) प्रभू श्रीरामाबद्दल बोलत आहेत. मात्र सीतामातेचा विषयी काहीच का बोलले जात नाही? प्रभू श्रीरामासह त्याही वनवासात गेल्या होत्या. हे लोक महिला विरोधी असल्यामुळेच सीतामातेबद्दल अवाक्षर काढत नाहीत. आम्ही दुर्गामातेला पूजणारे लोक आहोत, त्यामुळे त्यांनी आम्हाला धर्माबद्दल शिकवण देण्याचा प्रयत्न करू नये.”

“निवडणुकीच्या आधी धर्माचा राजकारणासाठी वापर करण्यावर माझा विश्वास नाही. प्रभू श्रीरामाची भक्ती करण्याला माझा अजिबात विरोध नाही. पण भक्तीच्या आडून लोकांच्या आहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे किंवा त्यावर निर्बंध आणणे, याला माझा विरोध आहे”, असेही ममता बॅनर्जी संहती मोर्चादरम्यान बोलल्या.

“तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी धर्मा-धर्मात सौहार्द निर्माण व्हावा, यासाठी हा मोर्चा काढल्याचे सांगितले जाते. कोलकात्यात काढलेल्या या मोर्चाला विविध धर्माचे प्रतिनिधी उपस्थित होते. अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रत्युत्तर म्हणून हा मोर्चा काढलेला नाही”, असेही ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तृणमूल काँग्रेसचे युवा नेते अभिषेक बॅनर्जी या मोर्चाबद्दल बोलताना म्हणाले, “बंगालसाठी आज अभिमानाचा दिवस आहे. आज संपूर्ण देश धार्मिक कार्यक्रमात गुंतला असताना दुसरीकडे बंगालमध्ये मात्र धार्मिक दुरावा कमी करून शांतता नांदण्यासाठी प्रयत्न होत आहेत. बंगालने कधीही धर्माचे राजकारण केले नाही. आमचा एकच धर्म आहे. तो म्हणजे सर्वांची सेवा करणे, सर्वांना मदत करणे.”