राजस्थानमधील अलवर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार महंत चांदनाथ यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते ६१ वर्षाचे होते. दिल्लीतील अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजप खासदार महंत चांदनाथ हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी जुलैमध्ये मठाच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली होती. बालकनाथ हे माझे उत्तराधिकारी असतील असे त्यांनी स्पष्ट केले होते. या कार्यक्रमाला योगगुरु रामदेवबाबा आणि योगी आदित्यनाथ हेदेखील उपस्थित होते. महंत चांदनाथ यांना कर्करोगाने ग्रासले होते. त्यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी रात्री उशीरा त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. निधनाचे वृत्त समजताच राजस्थानसह हरयाणा आणि दिल्लीत चांदनाथ यांच्या समर्थकांमध्ये शोककळा पसरली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp from alwar mahant chandnath passes away in delhi at age of 61 suffering from cancer
First published on: 17-09-2017 at 10:13 IST