भाजपा खासदार वरुण गांधी यांनी ‘नमामी गंगा मोहिमे’वरुन केंद्र सरकारवरच टीका केली आहे. ११ हजार कोटी रुपये खर्च करुनही गंगा नदी प्रदुषित का आहे? याला जबाबदार कोण असा सवाल वरुण गांधी यांनी विचारला आहे. याबाबत ट्वीट करत त्यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- गुजरातमध्ये विषारी दारु पिल्यामुळे २४ जणांचा मृत्यू; ३० पेक्षा अधिक लोक रुग्णालयात दाखल

‘गंगा आपल्यासाठी फक्त नदी नाही तर ‘आई’ आहे. आई गंगा करोडो देशवासीयांच्या जीवनाचा, धर्माचा आणि अस्तित्वाचा आधार आहे. त्यामुळे नमामी गंगेसाठी २० हजार कोटी रुपयांचे बजेट पास करण्यात आले होते. आतापर्यंत ११ हजार कोटी रुपये खर्च करूनही नदीचे प्रदूषण का होत आहे? असा सवाल वरुण गांधी यांनी विचारला आहे. ट्वीटमध्ये त्यांनी एक व्हिडिओही जोडला आहे. या व्हिडिओमध्ये गंगेत मृत्युमूखी पडलेल्या मासे दाखवण्यात आले आहेत. ‘गंगा ही जीवनदाता आहे, मग दूषित पाण्यामुळे मासे का मरतात? ही जबाबदारी कुणाची?’ असेही वरुण गांधींनी विचारले आहे.

हेही वाचा- “ख्रिश्चन नसते तर तामिळनाडूची अवस्था बिहारसारखी झाली असती”; नेत्याच्या विधानाने नवा वाद, भाजपानेही घेतली वादात उडी

महत्वाचं म्हणजे बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन वरुण गांधी काही काळापासून आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. गंगेच्या प्रदुषाबाबत केलेल्या ट्वीटनंतर वरुण गांधी चांगलेच चर्चेत आले आहेत. अनेक युजर्सने वरुण गांधींच्या या ट्वीटला रीट्वीट केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp varun gandhi criticize central government on namami gange project pollution of ganga dpj
First published on: 26-07-2022 at 16:55 IST