लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. देशातील सर्वच पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. दरम्यान, सत्ताधारी भाजपानेदेखील तयारीला सुरुवात केली आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून २९ फेब्रुवारी रोजी भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांच्या पहिल्या यादीवर चर्चा करण्यात आली.

रात्री उशिरापर्यंत बैठक

पीटीआयच्या वृत्तानुसार २९ फेब्रुवारी रात्री १०.३० वाजता या बैठकीला सुरुवात झाली होती. पुढे साधारण चार तास ही बैठक चालली. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित हेते. आगामी एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp top leaders meeting in delhi headquarters ahead of lok sabha election 2024 soon may releases first list of candidate prd
First published on: 01-03-2024 at 11:56 IST