नोटाबंदीनंतर सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मार्च अखेरीस केवळ ४९०० कोटींचे काळे धन घोषित करण्यात आले आहे. आयकर विभागाच्या एका अधिकाऱ्याने ‘पीटीआय’ला दिलेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत २१ हजार लोकांनी काळ्या धनाची घोषणा केली आहे. यातून सरकारला २ हजार ४५१ रुपयांचा महसूल मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू केली होती. सरकारने सुरू केलेल्या या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीटीआयच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अर्थ मंत्रालयाने ही योजना सुरू केली होती. या योजनेनुसार घोषित करण्यात येणाऱ्या रकमेवर ५० टक्के आयकर आणि दंड भरावा लागणार होता. तसेच २५ टक्के रक्कम पुढील चार वर्षांपर्यंत विनाव्याज सरकारकडे जमा करणे बंधनकारक करण्यात आले होते. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची कबुली महसूल सचिव हसमुख अधिया यांनी मार्चमध्ये दिली होती. ही योजना केवळ ३१ मार्चपर्यंतच होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black money rs 4900 crore disclosed 21000 people pradhan mantri garib kalyan yojna post demonetisation
First published on: 08-09-2017 at 10:06 IST