जम्मूच्या राजौरी येथून एक आश्चर्य व्यक्त करणारी बातमी समोर आली आहे. राजौरीच्या नौशेरा येथे भीक मागून राहत असलेल्या एका वृद्ध महिलेच्या झोपडीत चक्क २,६०,००० रुपये सापडले आहेत. रस्त्याच्या बाजूला झोपडीत ७० वर्षीय वृद्ध महिला गेल्या तीस वर्षापासून राहत होती. प्रशासनाने झोपडी काढून वृद्ध महिलेला वृद्ध आश्रमात नेले. तेव्हा झोपडीखाली सापडलेल्या नोटा पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

ही वृद्ध महिला राजौरी उपजिल्हा, नौशहराच्या वॉर्ड क्रमांक नऊमध्ये भीक मागून राहत होती. स्थानिक लोक या वृद्ध महिलेची मदत करत होते. कोणी तीला पैसे देत होते तर, काही अन्न आणि कपडे देत होते.

राजौरी जिल्हा प्रशासनाने रस्त्यावर राहणाऱ्या निराधार लोकांना आधार देण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. यामध्ये अशा लोकांना वृद्धाश्रमात नेले जात आहे. आश्रम राजौरी येथून काही लोक आले आणि त्यांनी या वृद्ध महिलेस आपल्याबरोबर घेतले.

प्रभाग सदस्याने सांगितले की, “वृद्ध महिला ३० वर्षे येथे राहत होती. काल ही टीम राजौरीहून आली आणि महिलेला वृद्धाश्रमात घेऊन गेली. त्यानंतर पालिकेच्या पथकाला घराच्या कचराकुंडीतील बॉक्समध्ये नोटा मिळाल्या.”

हेही वाचा- Video: करोनावर मात करण्यासाठी दोन पऱ्या आल्याचं ऐकून शेकडो गावकऱ्यांनी केली गर्दी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेव्हा पालिकेला रस्त्याच्या कडेला असलेली झोपडी हटविण्यास सांगितले. तेव्हा पालिकेच्या कर्मचार्‍यांनी तिथे साफसफाई सुरू केली. दरम्यान त्यांना झोपडीतून काही पैसे मिळाले. कर्मचार्‍यांनी अधिक शोध घेतला असता त्यांना पैशाने भरलेला दुसरा बॉक्स सापडला. यानंतर बेडच्या खालीही पैसे सापडले, जे छोटे लिफाफ्यात ठेवले होते.