‘ए टीम-बी टीम’ असे शिक्के मारणे थांबवा! महाराष्ट्रातील पक्षांना चंद्रशेखर राव यांचा सल्ला | brs is neither congress a team nor bjp b team says k chandrasekhar rao zws 70

पंढरपूर : ‘‘माझा पक्ष छोटा आहे. त्याची भीती महाराष्ट्रातील पक्ष का बाळगत आहेत? काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आम्हाला भाजपाची बी टीम म्हणतात. दुसरीकडे भाजपने आम्हाला काँग्रेसची ए टीम म्हटले आहे. असे शिक्के मारणे बंद करा,’’ असा खोचक सल्ला तेलंगणचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांनी राज्यातील प्रस्थापित पक्षांना मंगळवारी दिला. सोलापूर तालुक्यातील सरकोली येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

Venkateswara Mahaswami who has stood on three Lok Sabha seats is in trouble
तीन लोकसभा जागांवर उभे राहिलेले व्यंकटेश्वरा महास्वामी अडचणीत; गुन्हा दाखल होणार
vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला
Hasan Mushrif
आम्हालाही प्रत्युत्तर द्यावे लागेल – हसन मुश्रीफ यांचा कोल्हापुरातील ‘मविआ’ला इशारा

तब्बल ६०० गाडय़ांच्या ताफ्यासह सोमवारी सोलापूरात दाखल झालेल्या राव आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी सकाळी पंढरपूरात येऊन विठूमाऊलीचे दर्शन घेतले. त्यानंतर शेतकरी मेळाव्यात त्यांनी राज्यातील पक्षांवर तोफ डागली. ते म्हणाले, की इथले राजकारणी म्हणतात इथे या, दर्शन घ्या, पण राजकारण करू नका. या सगळय़ा पक्षांना आमच्या पक्षाची एवढी भीती का वाटते आहे? तुम्ही जनतेची कामे प्रामाणिकपणे केली असतील तर तुम्हाला समर्थन मिळेल. आत्मपरीक्षण करण्याऐवजी, हे पक्ष दुसऱ्या पक्षाला नावे ठेवण्याचे काम करीत आहेत. शेतकरी, मागास वर्ग, दुर्बल घटक यांच्यासाठी काम करून तेलंगणमध्ये विकासाचे पर्व उभे केल्याचा दावाही राव यांनी यावेळी केला. दरम्यान, राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी समर्थकांसह भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला.

महाराष्ट्रातील पक्षांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. शेतकरी, दुर्बल घटक आणि मागासवर्गीय समाज या आजवर दुर्लक्षित राहिलेल्या घटकांसाठीच आमचा पक्ष कार्यरत राहणार आहे. – के. चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री,