Skybus Project Latest News: देशातील महानगरांमध्ये वाहतूक कोडींची समस्या दिवसेंदिवस मोठी होत चालली आहे. यावर तोडगा म्हणून हवेत उडणारी बस अर्थात स्कायबसकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. भारतात स्कायबस कधी येणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. यावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. बंगळुरूमध्ये स्कायबसबाबत अभ्यास सुरू असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बंगळुरूत स्कायबस सुरू होणार का? गडकरी म्हणाले, “हा उपाय व्यवहार्य…”

“ज्या शहरात रस्ते मोठे करता येत नाहीत. जमीन अधिग्रहणाबाबत समस्या निर्माण होतात, अशा शहरांमध्ये स्कायबसचा पर्याय उपयुक्त आहे”, असे नितीन गडकरी म्हणाले आहेत. दोन टेकड्यांमध्ये धावणारी २०० प्रवासी क्षमता असणारी स्कायबस फिलिपिन्समध्ये सुरू आहे. याच धर्तीवर भारतात स्कायबस सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

“तुम्हाला सांगतो, या सरकार-बिरकारच्या भरंवशावर राहू नका”, नागपुरात नितीन गडकरींचा शेतकऱ्यांना सल्ला!

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून प्रयत्न केले जात आहेत. बंगळुरूमध्ये स्कायबस किंवा ट्रॉली बस सुरू केल्यास हा उपाय व्यवहार्य ठरेल का? याबाबत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी केले होते. या तज्ज्ञांचा अहवाल तीन महिन्यांमध्ये मिळणार आहे. या अहवालानंतरच भारतात स्कायबसबाबत पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cabinet minister of road transport nitin gadkari commented on skybus in india rvs
First published on: 12-09-2022 at 09:36 IST