पीटीआय, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्याचा प्रचार गुरुवारी समाप्त झाला. सहा राज्ये तसेच दोन केंद्रशासित प्रदेशांतील ५८ जागांवर उद्या, शनिवारी मतदान होत आहे. दिल्लीतील सर्व सात जागा, हरियाणातील सर्व १० जागा आणि उत्तर प्रदेशातील १४ जागांचा यामध्ये समावेश आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी मतदारसंघातही मतदान होणार आहे.

सहाव्या टप्प्यात एकूण ८८९ उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यातील काही महत्त्वाच्या जागांमध्ये नवी दिल्ली, ईशान्य दिल्ली, वायव्य दिल्ली व राष्ट्रीय राजधानीतील चांदनी चौक तसेच उत्तर प्रदेशातील सुलतानपूर आणि आझमगड यांचा समावेश आहे. जम्मू आणि काश्मीरचे अनंतनाग-राजौरी, पश्चिम बंगालचे तमलूक, मेदिनीपूर, हरियाणाचे कर्नाल, कुरुक्षेत्र, गुडगाव, रोहतक आणि ओडिशाचे भुवनेश्वर, पुरी आणि संबलपूर या इतर महत्त्वाच्या जागा आहेत. निवडणुकीच्या या टप्प्यात भाजप तसेच काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांनी दावे केले आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला.

हेही वाचा >>>मारहाणीच्या घटनेसंदर्भात बोलताना स्वाती मालीवाल भावूक; म्हणाल्या, “माझं काय होईल? माझ्या करिअरचं…”

ओडिशात विधानसभेसाठी मतदान

ओडिशामध्ये शनिवारी लोकसभा निवडणुकांबरोबरच विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे़ विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांत ४२ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे.

● धमेंद्र प्रधान, संबलपूर, ओडिशा (भाजप)

● मनोज तिवारी, ईशान्य दिल्ली (भाजप)

● कन्हैया कुमार, ईशान्य दिल्ली (काँग्रेस)

● मनेका गांधी, सुलतानपूर (भाजप)

● मेहबुबा मुफ्ती, अनंतनाग-राजौरी (पीडीपी)

● मनोहरलाल खट्टर, कर्नाल (भाजप)

● नवीन जिंदाल, कुरुक्षेत्र (भाजप)