पश्चिम कॅनडामध्ये सहा प्रौढ व दोन मुलांना एका नैराश्यातून एका इसमाने ठार केले व नंतर स्वत:लाही संपवले. अतिशय असंवेदनशील अशा या प्रकरणात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. गेल्या सोमावारी १० लाख लोकसंख्या असलेल्या दक्षिण एडमंटन भागात एका इसमाने तीस वर्षांच्या एका महिलेला ठार करून तो पळाला, असे पोलीस प्रमुख रॉड नेक्ट यांनी सांगितले. संशयित मारेकरूच्या नातेवाईकांनी सांगितले की, त्याला आत्महत्या करायची होती. नंतर तो उत्तरेकडील त्याच्या निवासस्थानी आला तेथे त्याने सातजणांची हत्या केली. त्यात तीन महिला, दोन पुरुष व एका मुलाचा समावेश होता. मरण पावलेल्यांची नावे लगेच समजू शकली नाहीत. आत्महत्या करू पाहणाऱ्या या इसमाने प्रथम दुसऱ्या एका घराचा अंदाज घेतला.
मारेकऱ्याचा मृतदेह फोर्ट सासकाशेवान या ईशान्येकडील व्हिएतनामी रेस्टॉरंटमध्ये सापडला आहे. डिटेक्टिव्हजींनी मारेकऱ्याचा शोध घेतला असता तो लगेच सापडला. ज्या घरात सात मृतदेह सापडले त्या घरात आर्थिक कुरबुरी होत्या व एक महिला फोर्ट साकाचेवान हॉटेलची मालक होती. या खून नाटय़ाचा नेमका घटनाक्रम लागलेला नाही. सामान्य लोकांना त्याचा कुठलाही त्रास झाला नाही असे एडमंटन जर्नलने म्हटले आहे.