मालवाहू जहाज थेट पुलावर आदळल्याची धक्कादायक घटना चीनमध्ये घडली आहे. या दुर्घटनेत एकूण २ जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी तर तीन जण पाण्यात बेपत्ता झाले आहेत. विशेष म्हणजे या अपघातानंतर एका बससह एकूण पाच वाहनं नदीत बुडाली आहेत. या धक्कादायक दुर्घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार चीनमधील गुआंझू शहरातील नदीवर एक पूल आहे. या पुलावर मालवाहू जहाज आदळले. यामुळे या पुलाचा काही भाग चक्क नदीत कोसळला. ही दुर्घटना घडली तेव्हा काही वाहने पुलावरून जात होती. त्यामुळे जहाज पुलावर आदळल्यानंतर पुलावरून जाणारी काही वाहनेदेखील नदीत बुडाली. या वाहनांचा सध्या शोध घेतला जातोय. पुलावर आदळलेले जहाज हे फोशान येथून गुआंझू येथे जात होते. दुर्घटनाग्रस्त पुलाचे नाव ‘लिक्सिनशा पूल’ असे आहे. पुलावर आदळलेले मालवाहू जहाज रिकामे होते.

An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
thane traffic jam, ghodbunder traffic jam,
ठाणे: कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प
dombivli traffic jam marathi news
माणकोली पुलावरील वाहन संख्या वाढल्याने डोंबिवलीतील रेतीबंदर रेल्वे फाटकात वाहनांच्या रांगा
Unknown cargo ship collided with fishing boat in Palghar sea
पालघर समुद्रातील मासेमारी नौकेस अज्ञात मालवाहू जहाजाची धडक

नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा निर्णय

चीनच्या चायना सेंट्रल टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) नावाच्या स्थानिक वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त दिलंय. या दुर्घटनेनंतर जहाजाच्या कॅप्टनला ताब्यात घेण्यात आलंय. तसेच दुर्घटनाग्रस्त परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. दुर्घटनाग्रस्त पुलाचे नुतनीकरण करण्यात येणार होते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून नुतनीकरणाचे काम वेगवेगळ्या कारणांमुळे लांबणीवर पडत गेले.

पुलाचे बॉक्स गर्डर झाले होते खराब

जुले २०१९ मध्ये या पुलाचे बॉक्स गर्डर खराब झाले होते. त्यानंतर १५ टनापेक्षा जास्त वजन असलेल्या वाहनांना या पुलावरून जाण्यास मनाई करण्यात आली होती. जुलै २०२० मध्ये बॉक्स गर्डरची दुरुस्ती केल्यानंतर ही बंधनं हटवून २० टन वजनापर्यंतच्या वाहनांना या पुलावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती.