पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आणि उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्याविरुद्ध अमेरिकेतील न्यायालयात खटला दाखल केला आहे. याप्रकरणी तिघांनाही अमेरिकन न्यायालयाने समन्स बजावले आहेत. विशेष बाब म्हणजे भारतीय-अमेरिकन डॉक्टर लोकेश वायुरू यांनी पेगासस, भ्रष्टाचारासह अनेक मुद्द्यांवरून हा खटला दाखल केला आहे.

हेही वाचा- गौतम अदानींचे पंतप्रधान मोदींशी जवळचे संबंध? विरोधकांच्या आरोपांवर अदानींनी दिलं उत्तर; म्हणाले, “देशातील २२ राज्यांत…”

डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाच्या यूएस डिस्ट्रिक्ट कोर्टानं या तिघांसह इतर अनेकांना याबाबत समन्स जारी केले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतात याबाबत समन्स पाठवण्यात आले होते. खटला दाखल करण्यात आलेल्यांमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रोफेसर क्लॉस श्वाब यांचाही समावेश आहे.

हेही वाचा- Adani Shares: अदाणींच्या शेअर्सची वाताहत सुरूच; एकूण ११८ अब्ज डॉलर्सचा फटका!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे पूर्ण प्रकरण?

रिचमंडस्थित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ लोकेश वुरुरू यांनी पंतप्रधान मोदी, रेड्डी आणि अदानी यांच्याविरोधात हा खटला दाखल केला आहे. मूळचे आंध्र प्रदेशातील डॉक्टर लोकेश वायुरू यांनी पंतप्रधान मोदी, रेड्डी, अदानी आणि इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच अमेरिकेत मोठ्या प्रमाणात रोख हस्तांतरण आणि राजकीय विरोधकांविरुद्ध गुप्तचर सॉफ्टवेअर पेगासस वापरल्याचा आरोप आहे.
याबाबत डॉक्टरांनी कोणताही पुरावा सादर केलेला नाही. २४ मे रोजी डॉक्टरांनी दावा दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने २२ जुलै रोजी समन्स जारी केले होते. न्यूयॉर्कमधील प्रख्यात भारतीय-अमेरिकन वकील रवी बत्रा यांनी याला “व्यर्थ खटला” म्हटले आहे.