नवी दिल्ली : केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (कॅट) आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांची मुंबईहून चेन्नईला केलेली बदली रद्द केली आहे. महसूल विभागाने बदलीसंदर्भात स्वत:च तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका ‘कॅट’ने ठेवला आहे. न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि सदस्य राजिंदर कश्यप यांचा समावेश असलेल्या न्यायाधिकरणाने वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाने जारी केलेल्या बदली निर्णयामध्ये त्रुटी आणि पक्षपात आढळला असल्याची टिप्पणी केली.

सरकारी अधिकाऱ्यांना अखिल भारतीय सेवेचे बंधन असले तरी बदली धोरण निष्पक्ष, पारदर्शक आणि न्याय पद्धतीने राबविले जावे तसेच जोपर्यंत मनमानीपणे अथवा नियमांचे उल्लंघन कोणी करत नाही तोपर्यंत न्यायालयाने हस्तक्षेप करू नये, अशी टिप्पणी न्यायाधिकरणाने केली. कॅटने २० फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या आदेशात प्रतिवादींनी केलेली कृतीच अशी आहे जी धोरणाच्या चौकटीतही बसत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वानखेडे यांची बदली करताना विभागाने मार्गदर्शक सूचनांचे स्पष्ट उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत प्रतिवादींवर कोणताही दंड लावण्याचे टाळत असल्याचे आदेशात नमूद केले आहे. ३० मे २०२२ रोजी बदली झाल्यानंतर वानखेडे सध्या चेन्नई येथील महसूल विभागात अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते मुंबईमध्ये एनसीबीचे विभागीय संचालक होते. त्यांच्या कार्यकाळात, कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला गोवण्याची धमकी देऊन खान कुटुंबाकडून २५ कोटींची मागणी केल्याचा आरोप झाला होता.