कुंदाचे पोलीस उपअधीक्षक झिआ- उल्- हक यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशचे माजी मंत्री रघुराज प्रताप सिंग उपाख्य राजाभया निर्दोष असल्याचा निर्वाळा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिला आह़े  या प्रकरणी गुरुवारी सीबीआयने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात राजाभयांच्या निदरेषत्वाचा दावा करण्यात आला आह़े
हक यांच्या पत्नी परवीन आझाद यांच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आलेल्या प्रथम माहिती अहवालात राजाभयांवर हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता़  परंतु, याबाबत सीबीआयने ‘तांत्रिकदृष्टय़ा समारोप अहवाल’ही सादर केला़  राज्य पोलिसांनी घटनेनंतर नोंदविलेल्या गुन्ह्याशी हा अहवाल जोडून घ्यावा, अशी विनंतीही या वेळी सीबीआयने न्यायालयाला केली़  राजाभया यांनी स्वत:चा प्रभाव वापरून अनेक गावकऱ्यांना प्रतापगढ जिल्हा प्रशासनाकडून शस्त्रांचे परवाने मिळवून दिल़े  ही शस्त्रे त्यांच्या आज्ञेनुसार अनधिकृत कृत्यांसाठी वापरण्यातही येत असल्याचा आरोप आह़े  ही बाब त्यांच्या चौकशीत उघडकीस आल्याचे सीबीआयने म्हटले आह़े  परंतु, हे प्रकरण सीबीआयच्या चौकशी क्षेत्रात येत नाही़  त्यामुळे याची माहिती राज्याला चौकशी आणि पुढील कारवाईसाठी देण्यात येईल, असेही सीबीआयने म्हटले आह़े तसेच एक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि एका हवालदाराला यांना कठोर शिक्षेची मागणीही सीबीआयने केली आह़े  ग्रामस्थांनी हक यांच्यावर हल्ला केला तेव्हा हे त्यांना सोडून निघून गेले होत़े