संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाची तारीख आणि कालावधी निश्चित करण्यासाठी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली संसदीय व्यवहार मंत्रिगटाची बैठक होणार आहे. १८ जुलैपासून सुरू होणारे अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत चालेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत आसाममध्ये भाजपला सत्ता मिळवण्यात यश आले आहे. त्याचबरोबर केरळमध्येही पक्षाची कामगिरी सुधारली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे मनोबल वाढले आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारला मे महिन्यात दोन वर्षे पूर्ण झाली. या दोन वर्षामध्ये देशामध्ये बदल होऊ लागल्याचे भाजपचे म्हणणे आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात या दोन्ही घडामोडींचे प्रतिबिंब उमटणार हे निश्चित आहे.
राज्यसभेमध्ये सध्या ४५ विधेयके प्रलंबित आहेत. तर लोकसभेमध्ये पाच विधेयके प्रलंबित आहेत. ती मंजूर करून घेण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार, हे निश्चित आहे. त्यातही वस्तू व सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेण्यासाठी सरकार अधिक प्रयत्नशील असणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jun 2016 रोजी प्रकाशित
संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून?
राज्यसभेमध्ये सध्या ४५ विधेयके तर लोकसभेमध्ये पाच विधेयके प्रलंबित आहेत

First published on: 28-06-2016 at 15:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ccpa to meet tomorrow to decide monsoon session dates