१ मे पासून जनगणनेला सुरुवात; जाणून घ्या काय विचारले जाणार प्रश्न?

नव्या दशकासाठी जनगणनेच्या कामाला १ मे २०२० पासून सुरुवात होणार आहे. यासाठी पूर्वतयारीही सुरु झाली आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

नव्या दशकासाठी जनगणनेच्या कामाला १ मे २०२० पासून सुरुवात होणार आहे. यासाठी पूर्वतयारीही सुरु झाली आहे. यासाठी सरकारकडून अनेक बैठकाही घेतल्या जात आहेत. रजिस्ट्रार जनरल आणि भारतीय जनगणना आयुक्त विवेक जोशी यासंदर्भतील अधिसूचनाही जारी केली आहे. दरम्यान, जनगणनेदरम्यान विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जनगणना कायदा कलम ८ च्या उपकलम १ नुसार होणार होत असलेल्या जनगणनेसाठी सरकारने सर्व जनगणना कार्यालयांना प्रश्नावली पाठवली आहे. या प्रश्नांमध्ये घराच्या मालकाचे नाव, घर क्रमांक आणि घराच्या स्थितीसह अनेक प्रश्नांचा समावेश आहे.

 • जनगणना कर्मचारी आपल्या घरी आल्यानंतर कुठले प्रश्न विचारतील
 1. इमारत क्रमांक (पालिका किंवा स्थानिक अधिकृत क्रमांक) काय?
 2. घर क्रमांक काय?
 3. घराचे बांधकाम करताना छत, भिंती आणि सिलिंगमध्ये मुख्यत्वे वापरण्यात आलेले साहित्य कोणते?
 4. घराचे बांधकाम कोणत्या कारणासाठी होत आहे ?
 5. घराची स्थिती काय?
 6. घराचा क्रमांक किती?
 7. घरात राहणाऱ्या लोकांची एकूण संख्या किती?
 8. कुटुंबप्रमुखाचे नाव काय आहे?
 9. कुटुंबप्रमुख स्त्री आहे की पुरुष?
 10. कुटुंबप्रमुख अनुसुचित जाती, अनुसुचीत जमाती किंवा इतर समाजातील आहेत का?
 11. घराच्या मालकी हक्काची स्थिती काय आहे?
 12. घरातील खोल्यांची एकूण संख्या किती?
 13. घरात किती लग्न झालेली जोडपी राहतात?
 14. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत काय आहे?
 15. घरात पाण्याच्या स्त्रोताची उपलब्धता काय?
 16. वीजेचा मुख्य स्त्रोत काय?
 17. शौचालय आहे कि नाही?
 18. कोणत्या प्रकारचे शौचालय आहे?
 19. ड्रेनेजची व्यवस्था आहे का?
 20. घरात वॉशरुम आहे की नाही?
 21. स्वयंपाक घर आहे की नाही, त्यात एलपीजी किंवा पीएनजीची जोडणी आहे किंवा नाही?
 22. स्वयंपाक घरात स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे इंधन कोणते?
 23. घरात रेडियो किंवा ट्रान्झिस्टर आहे का?
 24. टेलिव्हिजन सेट आहे का?
 25. इंटरनेटची सुविधा आहे की नाही?
 26. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर आहे की नाही?
 27. टेलिफोन किंवा मोबाईल फोन किंवा स्मार्टफोन आहे का?
 28. सायकल किंवा स्कूटर किंवा मोटरसायकल किंवा मोपेड आहे का?
 29. कार किंवा जीप किंवा व्हॅन आहे का?
 30. घरात मुख्यत्वे कोणत्या धान्याचा खाण्यासाठी वापर केला जातो?
 31. मोबाईल क्रमांक (जनगणनेसंबंधी संपर्कासाठी)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Census begins on may 1 know what questions to be ask aau