देशात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. मागच्या चार दिवसात करोनावर उपचार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दहा राज्यात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचं दिसून आलं आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दहा राज्यांचा आढावा घेतला. केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडु, ओडिशा, आसाम, मिझोरम, मेघालय, आंध्र प्रदेश आणि मणिपूर राज्यातील करोनास्थिती जाणून घेतली. तसेच करोनाबाबत उपाययोजना करणाच्या सूचना केल्या. ४६ जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे. तर ५३ जिल्ह्यांत करोना रुग्णवाढीचा दर ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहे. त्यामुळे अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यास सांगितलं आहे.

मागच्या काही आठवड्यात ज्या जिल्ह्यात करोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे, अशा ठिकाणी कडक निर्बंध लादण्याच्या सल्ला देण्यात आला आहे. वेळीच उपाययोजना केल्या नाही, तर स्थितीत आणखी बिकट होईल असं सांगण्यात आलं आहे. दहा राज्यातील ८० टक्के करोनाचे रुग्ण हे होम आयसोलेशनमधून समोर येत आहेत. त्यामुळे राज्यांनी वाड्या-वस्त्या, कॉलनीतील लोकांना एकमेकांना भेटण्यास मज्जाव करावा. रुग्णालयातील रुग्णांवर योग्य उपचार मिळावे, यासाठी उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर होम आयसोलेनमधील रुग्णांची योग्य देखभाल करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

भटक्या, निराधार व्यक्तींचं प्राधान्याने लसीकरण करा!; केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना

करोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक करण्यावर राज्य सरकार जोर देत आहे. या जिल्ह्यातील लसीकरण वेगाने केलं जातं आहे. तसेच या भागातील सीरो सर्व्हे करण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे. . केरळमध्ये करोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ६ सदस्यीय टीम पाठवली आहे.

काय! ‘करोना केअर फंड योजने’तून प्रत्येकाला मिळणार ४ हजार?; ‘त्या’ मेसेज मागील सत्य काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात २४ तासांत ४१ हजार ६४९ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. शुक्रवारी हाच आकडा ४४ हजार २३० इतका होता. त्यासोबतच देशात गेल्या २४ तासांत ३७ हजार २९१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. हे रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे करोनावर मात केलेल्या रुग्णांची आजपर्यंतची आकडेवारी आता ३ कोटी ७ लाख ८१ हजार २६३ इतकी झाली आहे.