चांद्रयान मोहीम आज पूर्णत्वास येणार आहे. भारताच्या दृष्टीने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. विक्रम लँडर आज चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी यासाठी संपूर्ण देशभरात प्रार्थना केली जाते आहे. या मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या संपूर्ण मोहिमेबाबत खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हटलं आहे दा. कृ. सोमण यांनी?

चांद्रयान २ ही आपली मोहीम अपयशी ठरली. त्यानंतर आता इस्रोच्या वैज्ञानिकांनी ही काळजी घेतली की या विक्रम लँडवरच्या सेन्सर्सनी काम केलं नाही तरीही सुखरुपपणे उतरणार आहे. यावर चार मोटर्स आहेत. त्यातल्या दोन सुरु झाल्या तरीही सॉफ्ट लँडिंग होईल. हे सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर यावर चार उपकरणं आहेत. जी उपकरणं आपलं काम सुरु करतात. विक्रम लँडरमधून एक रोव्हर बाहेर पडणार आहे. त्यानंतर हा रोव्हर चंद्रावर एका सेकंदाला एक सेंटीमीटर या गतीने फिरणार आहे. वाटेत उंच सखल प्रदेश आला तरीही तो काम करणार आहे. या रोव्हरची जी सहा चाकं आहेत त्यावर इस्रोचं बोधचिन्ह कोरलेलं आहे ही माहिती सोमण यांनी दिली.

हे पण वाचा- Chandrayaan 3 : ‘गली में आज चांद निकला’, ‘चांद छुपा बादल में’, बॉलिवूडचं चंद्राशी आहे गहिरं नातं.. ‘ही’ गाणी आजही चर्चेत

भारताचा तिरंगा आज चंद्रावर कोरला जाणार

तसंच पुढे दा. कृ. सोमण असं म्हणाले की, “भारताचा तिरंगा आणि इस्रोचं बोधचिन्ह यांचे ठसे चंद्राच्या वाळूत उमटणार आहेत. तिथे वातावरण नसल्यामुळे ते कायमचे राहणार आहेत. भारताचा तिरंगा आजपासून चंद्रावर असणार आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचं आयुष्य १४ दिवसांचं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे काम करणार आहेत. या दोहोंवर चार मशीन्स आहेत. हा जागतिक विक्रम आहे. कमी खर्चात हे यान चंद्रावर उतरुन काम करणार आहेत. चांद्रयान दोन मध्ये ऑर्बिटर होता तो चंद्राभोवती अजूनही फिरतो आहे. चांद्रयान ३ चा या ऑर्बिटरशी संपर्क झाला आणि दोघांनी एकमेकांना वेलकम केलं आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचं आयुष्य १४ दिवस आहे. विक्रम लँडर असं नाव देण्यामागची प्रेरणा विक्रम साराभाई आहेत. आज २३ ऑगस्ट ला संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंग करेल. विक्रम साराभाईंना ही खऱ्या अर्थाने मानवंदना ठरणार आहे. आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पण वाचा- ” Video: चंद्रयान ३ लँडिंगची वेळ जवळ आली! पुणेकरांनी केला होम व महाआरती तर देशभरात नमाज पठण सुरु

दक्षिण ध्रुवावरच यान का उतरवलं जाणार आहे?

चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे आपल्याला चांद्रयान १ ने दिले होते. आता त्याच्या शोधासाठी आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं यान उतरवणार आहे. या यानावरच्या मोटरने आणि लेझरने काम केलं नाही तरीही सॉफ्ट लँडिंग होईल. कारण इस्रोने याची काळजी घेतली आहे. भारताच्या संरक्षणासाठी, देशाच्या रक्षणासाठी या मोहिमा केल्या जातात. भारतीय बनावटीचं चांद्रयान ३ आहे. यामध्ये विविध कंपन्या सहभागी झाल्या आहेत. असंही सोमण यांनी म्हटलं आहे.