पाकिस्तानचे माजी माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी चांद्रयान-३ लँडिंग कार्यक्रम पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी प्रसारित करावा, अशा सूचना दिल्या आहेत. या मोहिमेला “मानवजातीसाठी ऐतिहासिक क्षण” म्हणत त्यांनी भारतीय शास्त्रज्ञ आणि अंतराळ समुदायाचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्वीट करून या ऐतिहासिक क्षणााबाबत मत व्यक्त केलं आहे.

ट्वीट करत फवाद चौधरी म्हणाले की, “पाकिस्तानच्या माध्यमांनी संध्याकाळी ६.१५ वाजता चंद्रयान चंद्रावर लँडिंग लाईव्ह दाखवावे. मानव जातीसाठी खासकरून शास्त्रज्ञांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. भारतातील अंतराळ समुदायाचे खूप खूप अभिनंदन.”

दरम्यान, चंद्र मिशन चांद्रयान-३ आज संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. ठिकठिकाणी प्रार्थना करण्यात येत आहे. शास्त्रज्ञांनी टचडाउनच्या आधीची २० मिनिटे अत्यंत महत्त्वाची असल्याची सांगितलं आहे.

हेही वाचा >> Chandrayaan-3 : दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी चांद्रयान लँडिंग कार्यक्रमात सहभागी होणार का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लँडिंग संध्याकाळी ६.०४ वाजता होणार आहे. हा ऐतिहासिक क्षण संपूर्ण देशभर थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांसाठी शाळा खुल्या असणार आहेत. ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण अफ्रिकेत गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीही या कार्यक्रमात ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.