छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात ९ जवान शहीद झाले. या स्फोटात सहा जवान जखमी झाले असून यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुकमा जिल्ह्यातील किस्तराम परिसरातून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २१२ व्या बटालयनचे जवान जात होते. यादरम्यान नक्षलवाद्यांनी आयईडीद्वारे स्फोट घडवला. या स्फोटात आठ जवान घटनास्थळीच शहीद झाले. तर सहा जवान गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

तेलंगण सीमेवर छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात २ मार्च रोजी सुरक्षा दलांनी माओवाद्यांवर कारवाई केली होती. या चकमकीत १० माओवादी ठार झाले. तर एक जवान शहीद झाला होता. माओवाद्यांच्या कॅम्पवर त्यांचे मोठे नेते असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी पुजारीकंकर जंगलात घुसून कारवाई करत माओवाद्यांना दणका दिला होता. या कारवाईचा बदला घेण्यासाठी माओवाद्यांनी जगदलपूरवरुन हैदराबादकडे जाणाऱ्या महामार्गावरही गेल्या आठवड्यात धुमाकूळ घातला होता. तेलंगण परिवहन मंडळाच्या तीन बसेस जाळण्यात आल्या होत्या. या बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचीही माओवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या पाठोपाठ सुकमा येथेही हल्ला करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhattisgarh 9 crpf personnel killed in ied blast naxal attack in sukma
First published on: 13-03-2018 at 14:23 IST