चीनमधून जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात होण्याऱ्या निर्यातीमध्ये १६.३ टक्क्यांनी वाढ झालीय. रशिया आणि जगभरातील देशांमधून होणाऱ्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर चीनमधून इतर देशांना खास करुन रशियाला होणाऱ्या निर्यातीत वाढ झाल्याने चीनला फायदा झालाय. (युद्धाचे लाइव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा) सोमवारी जारी करण्यात आलेल्या एका आकडेवारीमधून ही माहिती पुढे आल्याचं एएफपीने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

नक्की पाहा >> Photos: युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन तोफा, गाड्यांवर Z, O, X, V अक्षरं का लिहिली आहेत? त्यांचा अर्थ काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीन आणि युक्रेनमधील तणाव नोव्हेंबरपासून वाढू लागला आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा चीनला झालाय. युक्रेन आणि रशियामधील युद्ध २४ फेब्रुवारीपासून सुरु झालं असलं तरी यासंदर्भातील परिणाम लक्षात घेत रशियाने इतर देशांवरील आपली निर्भरता कमी करत चीनचा आधार घेतल्याने चीनला मोठा फायदा झालाय.

नक्की वाचा >> Ukraine War: “मी मेलो तरी…”; पाळीव बिबट्या, ब्लॅक पँथरला युक्रेनमध्ये सोडून येण्यास भारतीयाचा नकार

चीनमधील निर्यात वाढीचा वेग हा अपेक्षेपेक्षाही अधिक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा निर्यातीचा दर वाढून १५.७ टक्क्यांपर्यंत असेल असं म्हटलं जातं होतं. मात्र मागील वर्षीच्या जानेवारी-फेब्रुवारीच्या तुलनेत यंदाची चीनमधून रशियात होणारी निर्यात ही ४१ टक्क्यांनी अधिक आहे. या वर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये चीनमधून निर्यात करण्यात आलेल्या मालाची किंमत ५४४.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी होती. चीनच्या सीमाशुल्क सामान्य प्रशासनाने यासंदर्भातील आकडेवारी जारी केलीय.

नक्की वाचा >> Ukraine War: पोप फ्रान्सिस यांचा पुतिन यांना दणका; म्हणाले, “युक्रेनमध्ये रक्त आणि अश्रूंच्या नद्या…”

रशियाला करण्यात येणाऱ्या निर्यातीमध्ये ४१ टक्क्यांनी वाढ झालीय. चीनचं आर्थिक वर्ष हे याच कालावधीमध्ये सुरु होतं. चीनच्या आयातीमध्ये १५.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चीनमध्ये आयात करण्यात आलेल्या वस्तूंची किंमत ४२८.७५ बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच चीन आयात-निर्यातीमध्ये एकूण ११५.९५ बिलियन अमेरिकी डॉलर्सने नफ्यात आहे.

नक्की वाचा >> Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…

जगभरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून चीनच्या निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसलं आहे. मात्र त्याचवेळी देशातील मालमत्ता बाजार कोसळलाय. शनिवारी चीनने जीडीपीची वृद्धी ५.५ टक्के इतकी असेल असा अंदाज व्यक्त केलाय. १९९१ नंतरची ही जीडीपी वृद्धीची सर्वात कमी अपेक्षा आहे.

नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल

दोन महिन्यांमध्ये चीनच्या आयातीमध्ये सर्वात मोठा वाटा हा कोळश्याचा आहे. कोळश्याची मागणी दुप्पटीने वाढलीय. २०२१ च्या शेवटच्या महिन्यामध्ये अनेक ठिकाणी कोळश्याच्या टंचाईमुळे वीज पुरवठा खंडित करावा लागला होता. चीनच्या निर्यातीची एकूण आकडेवारी ही युरोपीयन महासंघ आणि अमेरिकेच्या निर्यातीपेक्षा अधिक आहे. रशिया हा चीनमधून आयात करणारा दुसरा सर्वात मोठा देश आहे. ते प्रामुख्याने ऊर्जा क्षेत्राशीसंबंधित गोष्टी आयात करतात. चीनसोबतचा व्यापार हा रशियासाठी आता फार महत्वाचा आहे. अनेक पाश्चिमात्य देशांनी, युरोपियन देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. २०१४ ला रशियाने क्रिमियाचा प्रदेश ताब्यात घेतल्यापासून अनेक देशांनी रशियासोबतचा व्यापार कमी केलाय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China exports up more than 16 percent as trade with russia surges scsg
First published on: 07-03-2022 at 14:04 IST