बीजिंग :प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) आयोजित केल्या जाणाऱ्या भारत-अमेरिका संयुक्त लष्करी सरावाला चीनने विरोध केला आहे. हा लष्करी सराव म्हणजे भारत आणि चीन यांनी स्वाक्षरी केलेल्या सीमा कराराच्या भावनांचे उल्लंघन आहे, असा आरोप चीनने बुधवारी केला.

उत्तराखंड राज्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून १०० किलोमीटर अंतरावर भारत आणि अमेरिका यांच्यात सहलष्करी कवायती करण्यात येणार आहे. ‘युध अभ्यास’ या नावाने या लष्करी कवायती होणार आहेत. आंतरकार्यक्षमता वाढवणे, शांतता राखणे आणि आपत्ती निवारण कार्यात दोन्ही सैन्यांमध्य कौशल्य सामायिक करणे हे या लष्करी सरावाचे उद्दिष्ट आहे. जवळपास दोन आठवडे हा सराव चालणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र भारत-अमेरिकेच्या संयुक्त लष्करी सरावाला चीनने जोरदार विरोध करायला सुरुवात केली आहे. १९९३ आणि १९९६ मध्ये चीन आणि भारत यांच्यात सीमा करारा करण्यात आला. या करारांच्या भावनांचे उल्लंघन हा लष्करी सराव करतो. चीन आणि भारत यांच्यातील परस्पर विश्वासाला यांमुळे तडा जाऊ शकतो, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले.