रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरूच असून रशियाकडून सातत्याने हल्ले सुरू आहेत. अशातच अमेरिकेने चीनला इशारा दिला आहे. युक्रेनमधील युद्धानंतर मॉस्को आणि रशियावर लादण्यात आलेले निर्बंध हटवण्यात बीजिंगने मदत केली तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी बीजिंगला दिली आहे.

युक्रेनवर रशियाचे आक्रमण सुरू झाल्यानंतर, मॉस्कोने चीनकडून लष्करी उपकरणे आणि समर्थन दोन्ही मागितले आहे, असे अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले. “आम्ही थेट, खाजगीत बीजिंगशी संवाद साधत आहोत. आम्ही त्यांना सांगितलंय की मोठ्या प्रमाणावर निर्बंध चुकवण्याच्या प्रयत्नांचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. रशियाला पाठिंबा दिल्यासही त्यांना बीजिंगला त्याची किंमत चुकवावी लागेल,” असं सुलिव्हन म्हणाले.
Ukraine War: “…तर रशियाची क्षेपणास्त्रं ‘नेटो’च्या सदस्य देशांवरही पडतील”; युक्रेननं दिला इशारा

दरम्यान, पोलंड सीमेजवळील युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण तळावर रशियाने रविवारी हल्ला केला. क्रूझ क्षेपणास्त्रांनी केलेल्या या हल्ल्यात ३५ जणांचा मृत्यू झाला, तर १३४ जखमी झाले. पोलंड ‘नेटो’चा सदस्य असून त्या देशाच्या सीमेलगतचा हा प्रशिक्षण तळ युक्रेनला पाश्चिमात्य मदत पुरवण्यासाठीचे प्रमुख केंद्र असल्याने रशियाने या तळावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नेटो देशांना रशिया लवकरच नेटो देशांवर हल्ले करेल असा इशारा दिलाय. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी रशियाकडून पोलंड आणि युक्रेनच्या सीमा भागांमध्ये झालेल्या हल्ल्यांनंतर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणाऱ्या झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा नेटो देशांना त्यांच्या नो फ्लाय झोन घोषित करण्याच्या मागणीची आठवण करुन दिली. ही मागणी नेटोने यापूर्वी फेटाळली होती. मात्र त्यामुळेच रशियाने अशाप्रकारे थेट युक्रेन-पोलंडच्या सीमा भागांमध्ये हल्ला केल्याचा झेलेन्सी यांच्या टीकेचा एकंदरीत सूर होता.