ब्रिटिश राजवटीत माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल हे उत्तर भारतात त्यांच्या दृष्टीने त्रासदायक ठरलेल्या आदिवासींच्या विरोधात विषारी वायूंचा वापर करणार होते, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जाइल्स मिल्टन या इतिहासकाराने सरकारी कागदपत्रांवरून ही बाब उघड केली आहे.
२० व्या शतकाच्या सुरुवातीला चर्चिल पंतप्रधान नसताना त्यांचे याबाबतचे मनसुबे मिल्टन यांनी आपल्या पुस्तकात उघड केले आहेत. याबाबत चर्चिल यांनी भारतीय कार्यालयाला तसा आदेश दिला हे धक्कादायक असल्याचे मिल्टन यांनी सांगितले. ते आदिवासी खरोखरच त्रासदायक ठरत असल्याने, त्यांच्या विरोधात विषारी वायूंचा वापर करा, असा या आदेशात स्पष्ट उल्लेख असल्याचे मिल्टन यांनी सांगितले.



