मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पूर्ण कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अचानक ही भेट का झाली असेल? यावर चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच माध्यमांना ही सदिच्छा भेट होती असं सांगितलं. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेल्या चर्चेचा तपशीलही स्पष्ट केला.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

महाराष्ट्रात जे प्रकल्प सुरु आहेत त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. तसंच इर्शाळगडच्या घटनेचीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून चौकशी केली. एवढंच नाही तर सर्वतोपरी मदतीचं आश्वासनही दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धारावीच्या प्रकल्पाची आवर्जून आठवण काढली. धारावी हा आशिया खंडातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लोकाचं जीवनमान उंचावेल असंही मोदी म्हणाले तसंच हा प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

हे पण वाचा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींना का भेटले? त्यांनीच सांगितलं कारण, म्हणाले….

महाराष्ट्रातल्या पुनर्वसन प्रकल्पांवरही चर्चा

महाराष्ट्रातले पुनर्वसनाचे प्रकल्प आणि एमएमआरडीएचे प्रकल्प यांना चालना देण्याच्या संदर्भातही या भेटीत चर्चा झाली. आपल्या हक्काचं घर असावं हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं त्या अनुषंगाने चांगली घरं उभी करणं हे सरकारचं काम असतं. त्यावर आम्ही चर्चा केली. केंद्र सरकारकडून विकास कामांना पूर्ण मदत केली जाईल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

कुटुंबासह घेतली सदिच्छा भेट

“आज संपूर्ण कुटुंबासह मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. ही भेट खूप चांगल्या पद्धतीने झाली. आम्हाला पंतप्रधान मोदींनी बराच वेळ दिला. मी यासाठी त्यांचा आभारी आहे. या दरम्यान राज्यात काय काय घडतं आहे? या विषयीही आम्ही चर्चा केली. पाऊस आणि इर्शाळगड यासंबंधीही आम्ही चर्चा केली.” असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पण वाचा- “अजितदादा-फडणवीस मिळून एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करतील, कारण…”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

आज आमच्या चार पिढ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्या याचा मला निश्चितच आनंद आहे. आज माझी आई हवी होती असं मला आवर्जून वाटतं आहे. माझे वडील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आनंदी झाले आहेत. असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांना सांगितलं. माझ्या वडिलांना आनंद झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायचं ही त्यांचीही इच्छा होती. आज आमच्या चार पिढ्या एकत्र होत्या. पंतप्रधान मोदी माझ्या नातवाबरोबरही गप्पा मारल्या आणि खेळले त्याचाही मला विशेष आनंद आहे. असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.